मुंबई

नवी मुंबईत दोन बलात्काराच्या घटना

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - नवी मुंबईतील सीवूड्‌स आणि एपीएमसी परिसरात दोन बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एक घटना सीवूड्‌स येथील फॅमिली पार्लर येथे; तर दुसरी घटना एपीएमसीतील लॉजमध्ये घडली. या संदर्भात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेतील आरोपी फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

सीवूड्‌स येथे फॅमिली पार्लरमध्ये आरोपी मोहम्मद इस्माईल अकबर अन्सारी (27) याने 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. ही तरुणी तुर्भे येथील चिता कॅम्प परिसरात राहण्यास असून, ती पार्लरमध्ये कामाला होती. आरोपी मोहम्मद हादेखील गत तीन महिन्यांपासून या ठिकाणी काम करत होता. दरम्यानच्या काळात मोहम्मद याने पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यातूनच त्याने गत 15 फेब्रुवारी रोजी सकाळी पार्लरमध्ये कुणीही नसताना, तरुणीसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यातच पीडित तरुणीचा दुसऱ्या तरुणासोबत विवाह ठरला होता. मात्र, आरोपी मोहम्मद ईस्माईल याने या तरुणीच्या होणाऱ्या पतीला फोन करून पीडित तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे सांगून तरुणीची बदनामी केली. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी मोहम्मद फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तर दुसऱ्या घटनेतील 23 वर्षीय तरुणी नेरूळ भागात राहण्यास असून, तिचे कुर्ला कसाईवाडा येथे राहणाऱ्या शाबाज जवाज खान (29) या तरुणासोबत मागील 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी शाबाज खान याने या तरुणीला लग्नाच्या भूलथापा दाखवून एपीएमसीतील लॉजवर लैंगिक अत्याचार केले. मात्र, त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे पाच वर्षे लैंगिक पिळवणूक केल्याप्रकरणी सदर तरुणीने शाबाजविरोधात चुनाभट्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली. 
web title : Two rape incidents in a love affair

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Mangalwedha Drought: मंगळवेढ्यात पाणी-चाऱ्यासाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे; काजू-बदामाच्या बैठकीवर चिरमुरे खाऊन आंदोलनाचा टोला

SCROLL FOR NEXT