Two robots from France in mumbai fire brigade helped carrying out fire operations sakal
मुंबई

Mumbai News : मुंबई अग्निशमन दलात लवकरच आणखी दोन अत्याधुनिक रोबो

धगधगत्या आगीत उडी घेऊन विझविणार आग; दोन्ही रोबो फ्रान्सवरून आणणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात पाच वर्षापूर्वी अत्याधुनिक रोबो दाखल झाल्यानंतर आता येत्या सहा महिन्यांत आणखी दोन रोबो दाखल होणार आहेत. हे दोन्ही रोबो फ्रान्सवरून खरेदी केले जाणार आहेत. दोन्ही रोबोसह व्हेईलकलसाठी ६ कोटी ८ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

रोबोंची वर्क ऑर्डर देण्यात आली असून पालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर खरेदी प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. बॅटरीवर चालणारे हे रोबो कितीही तास धगधगत्या आगीत व पसरलेल्या धुराशी सामना करीत चिंचोळ्या गल्ल्या आदी ठिकाणी सहज जाऊन तिथली आग विझवू शकणार आहे. अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

मुंबईत उंचच उंच टोलेजंगी इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींना आग लागल्यावर मोठ्या प्रमाणावर पसरणारी आगीची उष्णता आणि धूर यामुळे अग्निशमन दलाला आग विजवताना मोठी अडचण येते. अडचणींना सामोरे जाऊन आग नियंत्रणात आणली जाते. आता दलाच्या ताफ्यात आणखी दोन अत्याधुनिक रोबो दलाच्या मदतीसाठी य़ेणार आहेत. हा रोबो आगीच्या ज्वाळा, चिंचोळ्या गल्ल्या अशा ठिकाणी सहज जाऊन तिथली आग विजवू शकणार आहेत.

दोन्ही रोबोची किंमत ६ कोटी ८ लाख रुपये असणार आहे. रोबोतील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्टपणे दाखवेल. रोबो बॅटरीवर चालणारे असून ही बॅटरी चार तास चालते. मात्र ती संपल्यावर तात्काळ दुसरी बॅटरी जोडता येणार असल्याने रोबोला कितीही तास आगीशी झुंज देता येणार आहे.

सध्या ईस्त्रायल, चीन, अमेरिका असे रोबो तयार करते. विमानबांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा रोबो सुमारे ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो.

बेसमेंटवरून राहून आगीशी सामना करतानाच पसरलेल्या धुरातही जीन्यावरून वर इमारतीत शिरून रोबो आग विजवू शकणार आहेत. कॅमेरा बसविण्यात आला असल्याने घटनास्थळाचाही अंदाज घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT