मुंबई

चक्क लाच म्हणून अधिकाऱ्याने मागितल्या दोन साड्या, ACB कडून गुन्हा दाखल

अनिश पाटील

मुंबईः  सोसायटीच्या दुरुस्तीसाठी सिंकीग फंड वापरण्यास परवानगी देण्यासाठी सहकार अधिकाऱ्याने दोन साड्या आणि रोख रक्कम मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. या दोन साड्या स्विकारताना या अधिकाऱ्याच्या मुलाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार मालाड पश्चिम येथील एसव्ही रोड येथील एका सोसायटीचे चेअरमन आहेत. नुकतीच त्यांच्या सोसायटीचे दुरुस्तीचे सुरू करण्यात आले होते. त्यासाठी सिंकींग फंड वापरता यावा यासाठी सोसायटीच्या वतीने त्यांनी कांदिवली पूर्व येथील उपनिबंधक सहकारी संस्था येथे लेखी अर्ज केला होता. 

ती मागणीपूर्ण करण्यासाठी सहकार अधिकारी श्रेणी-1 याने दोन लाख रुपयांची मागणी केली. तसे न केल्यास सोसायटीला डिफॉल्टर घोषित करून कमिटी बरखास्त करण्याची नोटीस बजावण्याची धमकी दिली. त्यांनी पुन्हा संपर्क केला असता उपनिबंधक सहकारी संस्था येथील  सहकार अधिकारी श्रेणी-1 भरत काकड यांनी दोन लाख आणि दोन साड्यांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे अखेर सोसायटी चेअरमनने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने तपासणी केली असता अधिकाऱ्याने दोन लाख रुपये आणि दोन साड्या मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला असता काकड यांना खासगी कार्यालयात दोन लाख रुपये स्विकारताना आणि त्यांचा मुलगा सचिन काकड याला दोन साड्या स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी दोघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Two sarees demanded by officer bribe in Malad case filed by ACB

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT