Western Railway esakal
मुंबई

Western Railway : पश्चिम रेल्वेच्या तब्बल 2 हजार 525 फेऱ्या रद्द; कोणत्या दिवशी, किती लोकल रद्द? जाणून घ्या..

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना ११ दिवस लोकलमध्ये गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

बोरिवली-विरारकडे जाणाऱ्या एक हजार २७१ आणि चर्चगेट दिशेकडील एक हजार २५४ लोकल रद्द केल्या गेल्या आहेत.

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) खार-गोरेगावदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी, २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत लोकलच्या (Local Railway) तब्बल दोन हजार ५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना ११ दिवस लोकलमध्ये गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

लोकलची गती आणि क्षमता वाढवण्यासाठी लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येत आहे. खार ते गोरेगावदरम्यान ८.८ किमीची मार्गिका उभारण्याचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले आहे. त्यासाठी २९ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान लोकलच्या तब्बल २,५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, शनिवारपासून दररोज दिवसाला २५० पेक्षा जास्त लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागणार आहे. बोरिवली-विरारकडे जाणाऱ्या एक हजार २७१ आणि चर्चगेट दिशेकडील एक हजार २५४ लोकल रद्द केल्या गेल्या आहेत. त्याशिवाय लांब पल्ल्याच्या ४३ एक्स्प्रेसही रद्द राहणार असून अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत. १८८ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.

कोणत्या दिवशी किती लोकल रद्द

तारीख एकूण फेऱ्या

  • - २७ ऑक्टोबर २५६

  • - २८ ऑक्टोबर २५६

  • - २९ ऑक्टोबर २३०

  • - ३० ऑक्टोबर ३१६

  • - ३१ ऑक्टोबर ३१६

  • - १ नोव्हेंबर ३१६

  • - २ नोव्हेंबर ३१६

  • - ३ नोव्हेंबर ३१६

  • - ४ नोव्हेंबर ९३

  • - ५ नोव्हेंबर ११०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT