पाेलादपुरात दुचाकींमधील धडकेत दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत.
पाेलादपुरात दुचाकींमधील धडकेत दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत. 
मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीच्या अपघातात तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर सावंत कोंड रस्त्याजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री घडली असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर जखमींना महाड येथे हलविण्यात आले आहे.

पोलादपूर येथील सावंत कोंड रस्त्याजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये अक्षय कदम (वय २५ रा. लोहारे) हा आपल्या दुचाकीवरून आपला सहकाऱ्याला घेऊन जात होता. त्याच वेळी समोरून येणाऱ्या सुशांत शेडगे (वय २३ रा. लोहारमाळ) याच्या दुचाकीला बसली. या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर झाले असून योगेश मोहिते (वय २६, रा. लोहारमाळ) आणि अनिल पार्टे जखमी झाले.

या अपघाताची माहिती समजताच पोलिस हवालदार दीपक जाधव, आशीष नटे, वार्डे, जाधव, दराडे यांनी धाव घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर प्रथम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार झाल्‍यानंतर महाड येथे पुढील उपचारासाठी पाठविले. अपघाताप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT