Uddhav Thackeray ESakal
मुंबई

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Uddhav Thackeray strongly criticizes Amit Shah : घराणेशाहीवर झालेल्या टीकेलाही दिलंय प्रत्युत्तर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray Latest News : मुंबईमध्ये आयोजित शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीबद्दल केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. या मेळाव्यास संजय राऊत, आदित्य ठाकरे या पक्ष नेत्यांसह शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांसह विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुखांची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘’आज भाजप, मिंधेंकडे पैसा असेल पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीत. मुंबईवरती कुणाचा डोळा आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. खासकरून दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आजच एकजण येऊन गेला. आज खरंच काय योगायोग आहे मला माहीत नाही, मी दैनिकात दोन बातम्या पाहिल्या, ज्यात पहिल्या पानावर भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि आतमध्ये एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच अ‍ॅनाकोंडा येणार.‘’

तसेच ‘’आता आपण पेंग्विन आणले त्यामुळे लाखो पर्यंटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या उंचीची आणि बुद्धीची माणसं त्यावर टीका करताय, ते सोडून द्या. पण अ‍ॅनाकोंडा म्हणजे, माणसं गिळणारा साप आणि तो आज इकडे येऊन भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे. तू कशी गिळतो मी बघतोच.’’ असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

याचबरोबर ‘’भूमिपूजन करायला आले तर ते घराणेशाहीवर टीका करताय. यांचं कारटं तिकडे क्रिकट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्ष झालंय, ते त्याच्या क्रेडिटने झालंय, मेरिटने झालंय आणि घराणेशाही कोणाची, ठाकरेंची? अरे समोर तर उभा राहून दाखवं. त्या अब्दालीला मला सांगायचं आहे, आम्ही आमच्या आई-वडिलांचे ऋण  मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत.’’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला त्यांचा नामोल्लेख न करता प्रत्युत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT