Uddhav Thackeray Dasara Melava 
मुंबई

Uddhav Thackeray Dasara Melava: "गद्दारांनी दिल्लीची चाकरी करावी, निवडणुकीची गरज भासणार नाही"; दानवेंची शिंदे गटावर टीका

Sandip Kapde

Uddhav Thackeray Dasara Melava: उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. यावेळी विधानपरिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी मेळाव्याला संबोधित केले. त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. दसरा मेळावा एकच एकच असतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा. दसरा मेळावा मर्दाचा असतो. हे मर्द महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार आहेत, गद्दारांनी दिल्लीची चाकरी करावी, असे अंबादास दानवे म्हणाले.

सत्ताधाऱ्यांना आता घरी बसायचे आहे. निवडणुकीची देखील गरज भासणार नाही. त्यापूर्वी हे लोक घरी बसणार, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्रात पापींचे राज्य आहे. त्यामुळे निसर्ग देखील कोपतो आहे. राज्यात दुष्काळ आहे. एक रुपयाच्या पिक विम्याचे गाजर देण्यात आले. मात्र विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र उद्धव ठाकरे यांनी अग्रिम विमा देण्याची मागणी केली आहे आणि तो विमा मिळणार.

या सरकारमध्ये दम नाही. हे पीक विमा कंपन्यांच्या दाढ्या कुरवाळतं बसलेत. बुलेट ट्रेनसाठी 6000 कोटी मंजुर होतात पण शेतकर्‍याला अनुदान मिळत नाही, विमा मिळत नाही. अजब न्याय आहे, असे दानवे म्हणाले.

दानवे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील हाल आहेत. जुना कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात आहेत. नवीन कापूस आला मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, असे दानवे म्हणाले.

अंबादास दानवे यांनी सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यूंवर देखील शिंदे सरकारवर टीका केली. मृत्यू घरात येतोय आणि सरकार लोकांच्या दारी जात आहे, असे दानवे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Latest Marathi News Live Update : मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

साऊथ सुपरस्टारच्या पत्नीने दाखल केली घटस्फोटाची याचिका ! अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचे केले आरोप

Delhi Liquor Scam : ‘सीबीआय’ने घेतली उच्च न्यायालयात धाव; कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

SCROLL FOR NEXT