विजयादशमीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थ येथे भर पावसात पार पडला. यावेळी पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
याशिवाय, अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत आणि कर्जमुक्ती करावी, अशी मागणीही केली. तसेच, उद्धव ठाकरेंनी यावेळी त्यांच्या खास शैलीत सत्ताधारी पक्ष प्रामुख्याने एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवरही टिप्पणी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे. याच कारण कमळाबाई आहे. आता तुम्ही म्हणाला पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध? पण कमळाबाईच्या कारभाराने कमळबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे.
तसेच, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पण घरादारातही चिखल झालेला आहे. आजपर्यंत मराठवाडा हा आवर्षनग्रस्त होता आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे. मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, की शक्य होईल ती मदत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना करा. सरकारने त्यांच्या संज्ञा खड्ड्यात घालाव्यात आणि जनतेला आधी मदत करावी. सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दिलीच पाहीजे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
याशिवाय, यांची २०१७ झाली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजूनही होते आहे, शेतकरी अजून त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आज आपला दसरा मेळावा होतोय, आणखी दोन-तीन दसरा मेळावे होत आहेत, परंतु मला बाकींच्याबाबत बोलायचे नाही. पण संघाच्या दसरा मेळाव्यावर मी नक्कीच बोलणार आहे. कारण, १०० वर्षे ही काय थोडी नाही. आज संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती हा काय योगायोग आहे.
हा जनसुरक्षा कायदा आपल्याला तोडूनमोडून टाकायचा आहे. टाकलाच पाहीजे. कारण, मोंदींची स्तुती करत होते तोपर्यंत सोनम वांगचुक हे देशद्रोही नव्हते, पण आता त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, की ते पाकिस्ताना एका शिष्टमंडळात गेले होते. तर मग नवाज शरीफचा केक गपचुप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं? याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहीजे. न्याय हक्क मागणं हा या देशात देशद्रोह होतोय. तीन वर्षे मणिपूर जळतय आणि मोदी आता काल परवा गेले होते.
मला मोहन भागवतांना विचारायचं आहे, तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी संघाने १०० वर्षे मेहनत केली, त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला समाधान वाटतंय का? मला असं वाटतयं कदाचित भागवतांना सांगता येत नसेल पण आरक्षणाचा हेतून ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला ब्रह्मराक्षस झालेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.