Uddhav Thackeray and Eknath Shinde seen together during Ambadas Danve’s farewell in Maharashtra Legislative Assembly – a politically charged moment that drew attention statewide.  esakal
मुंबई

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Uddhav Thackeray and Eknath Shinde came face to face: हा प्रसंग घडत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच नेते एकक्षण अवघडल्याचे दिसत होते. तर पाहणाऱ्यांना मात्र चांगलीच मजा आली.

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray and Eknath Shinde Face-to-Face Moment: महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोड घडत असते, ज्याची चर्चा सर्वत्र होते. सर्वसामान्य जनताही मग त्या घटनेवर किंवा प्रसंगावर व्यक्त होवू लागते. कधी वादाचा, कधी हास्याचा तर कधी गंभीर प्रसंग घडतात. आज असाच काहीस परंतु जरा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वच मातब्बरांना एकक्षण अवघडायला लावणारा प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. 

निमित्त ठरले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभाचे. याप्रसंगी विधिमंडळातील सर्वच प्रमुख व्यक्तींचे सामूहिक फोटोसेशह सुरु होते. समोरील रांगेत. विधानसभा अध्यक्ष राम शिंदे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,  भाजपचेमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील अन् नीलम गोऱ्हे हे पहिल्या रांगेत खुर्चीवर बसलेले होते. तर या सर्वांच्या मागे सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी उभा होते.

तर फोटो सेशन सुरू असताना उद्धव ठाकरे यांची एन्ट्री झाली आणि मग खरी गंमत सुरू झाली. कारण, सध्याची राजकीय परिस्थिती बघता, आता उद्धव ठाकरे नेमकं बसणार कुणाच्या शेजारी हा मोठा प्रश्न होता. खरंतर याप्रसंगी उद्धव ठाकरे येतील हे कदाचित कुणालाही वाटलं नसावं, म्हणूनच पहिल्या रांगेत सुरुवातीस एकही खुर्ची रिकामी दिसत नव्हती.

मात्र उद्धव ठाकरे जेव्हा आले तेव्हा मग सुरुवातीस चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी बसण्यास जागा देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना बसण्यास सांगून, अंबादास दानवेंच्या म्हणण्यानुसार रांगेच्या दुसऱ्या दिशेस बसण्यास जाणे पसंत केले.

परंतु जसे उद्धव ठाकरे पुढे निघाले तेव्हा सर्वप्रथम त्यांना अजित पवार, राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री फडणवीस, राम शिंदे आणि मग त्यांच्या शेजारी बसलेले एकनाथ शिंदे दिसले अन् गमंत म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शेजारी खुर्ची तोपर्यंत रिकामी केली गेली होती, नीलम गोऱ्हे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना त्या खुर्चीवर बसण्यास विनंती केली.

मात्र हा प्रसंग घडत असताना सर्वजण एक अवघडल्यासारखे झाल्याचे दिसून आले. कारण, जसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले, तेव्हा त्यांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं. मात्र परिस्थितीच अशी होती की, त्यांना एक क्षण तरी एकमेकांच्या शेजारी यावे लागेल. मग अशावेळी दोघेजणही एकमेकांकडे पाठ करून उभा राहिले. मात्र दुसऱ्याच क्षणाला उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसण्यास सांगून, ते स्वत: चंद्रशेखर बावनकुळेंच्या शेजारील खुर्चीवर बसले. आणि अशाप्रकारे मग तो एक फोटो क्लिक झाला. ज्याचा आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT