Uddhav Thackeray 
मुंबई

Uddhav Thackeray: लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवर संक्रात येणार; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकले

उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात शाखेचे उद्घाटन केले. कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फार महत्वाची असल्याचे ठाकरे म्हणाले.

Sandip Kapde

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात दौरा केला. कल्याण लोकसभा मतदार संघात त्यांनी शाखेचे उद्घाटन केले.  कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फार महत्वाची असल्याचे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी मी या मतदार संघात आलो आहे. काल मोदी महाराष्ट्रात येऊन गेले. ते पुन्हा येतील. त्यांचे तिळगुळ वाटप सुरू आहे. पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशारहीवर संक्रात येणार आहे, हे मात्र नक्की.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. 22 जानेवारीला नाशिक काळाराम मंदिरात आरती करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, मी देशभक्त आहे, आंधळा भक्त नाही. राम मंदिरासाठी शिवसेनेच्या योगदानावरही ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, कारसेवक नसते तर अयोध्येत राम मंदिर बनले नसते.

ठाकरे पुढे म्हणाले, जेव्हा राम मंदिर बांधले गेले नव्हते, तेव्हा आम्ही दोनदा तिथे गेलो होतो. शिवजन्मभूमीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी अयोध्येला जाईन, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

मी कट्टर हिंदू आहे. राम मंदिरात शिवसेनेचे योगदान सर्वांनाच माहीत आहे. 22 रोजी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. यावेळीही आम्ही राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील कार्यक्रमासाठी आमंत्रित करणार आहोत. काल मोदींनी घराणेशाहीवर आरोप केला मात्र त्यांना गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय आहे. ७० कोटींच्या घोटाळ्याले त्यांना आजुबाजूला चालतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT