Uddhav Thackeray esakal
मुंबई

Uddhav Thackeray: जनाची नाही तर मनाची ठेवा...देवेंद्र फडणवीसांवर बोलताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह वक्तव्य!

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ सभाव घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली.

Sandip Kapde

Uddhav Thackeray:  दक्षिण मुंबईमध्ये अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. आदित्यला मुख्यमंत्री करतो, अडीच वर्षानंतर मी वरते जाणार म्हणजे दिल्लीत जाणार, असं फडवीस यांनी म्हटले होते, असा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केला. ते वडाळा अँटाप येथील सभेत बोलत होते.

मी देवेंद्र फडणवीसांचं बिंग फोडल्यामुळे ते चरफडले आणि भरकटले. मी भ्रमिष्ट आहे की नाही हे जनता ठरवेल. देवेंद्र फडणवीसांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी, लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

"अमित शाह बाळासाहेबांच्या खोलीत नाक रगडायला आले होते. अमित शाहांनी तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) बाहेर बसवलं होतं. तू बाहेर बस म्हणून अमित शाह यांनी म्हटलं. तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बसवलं. आज तुम्हाला त्या खोलीचं महत्व माहिती नाही, आमच्यासाठी ते मंदिर आहे अन् तुम्ही त्याला कुठलीतरी खोली म्हणता. तुम्ही नालायक माणसं, कुठलीतरी खोली म्हणता", अशी टीका उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांना विचाराची खोलीच तेवढी आहे. उथठ विचाराचे तुम्ही आहात. आज जे तुमच्या विरुद्ध रान पेटले ते तुम्हाला वाचवचा येत नाही. अशोक चव्हाण यांना त्यांच्या गावात देखील येऊ दिले जात नाही."

मुंबई रक्त सांडून कमावली आहे. ही मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे मोदी शाहांच्या़ पोटात दुखतं. महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवू देणार नाही. मोदींना देखील गुजरातला परत पाठवू...., असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई मोदी शाह यांच्या मित्राने मुंबईल लुटली. अहमदाबाद आर्थिक राजधानी व्हावी, असं मोदी शाहांना वाटतं. एमएआरडीए मुंबई मनपातून ३००० कोटी रुपये मेट्रो कंत्राटदाराला देतंय. एमएआरडीएकडून मिंधे सरकार बीएमसी लुटतंय, तर आम्ही एमएआरडीए रद्द करु, असे ठाकरे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT