Tensions escalate inside Maharashtra Assembly as supporters of Gopichand Padalkar and Jitendra Awhad clash; Uddhav Thackeray criticizes Devendra Fadnavis for alleged failure in maintaining discipline.  esakal
मुंबई

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Latest News''असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या, तर मैदानात या..'' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray reaction on clash between Gopichand Padalkar and Jitendra Awhad supporters: विधानभवनाच्या आवारात आज जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड राडा झाला. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. तर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या हाणामारीच्या घटनेवर मीडियाला प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''ते समर्थक आहेत, का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी त्याला पास दिले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे मग तो कुणीही असेल, ज्याने त्यांना पास दिले त्यांचं नाव समोर आलं पाहीजे. कारण, हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो, अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेला का, हा पण विषय आहे.''

तसेच ''मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहचली असेल, तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोब गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरीत कडक कारवाई केलीच पाहीजे. तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात, असं मी म्हणेन.'' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

याशिवाय, ''विधानभवनाच्या आवारात जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या, तर मैदानात या.. हे सगळ्या पवित्र असं मंदिर आहे आणि त्यात मग त्यांना पास कुणी दिले इथंपासून ते त्यांची जबाबदारी असणाऱ्या पोशिंद्यावर कारवाई झाली पाहीजे.'' अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

याचबरोबर ''विधानभवनाच्या बाहेर हा एक विषय आहे आणि विधानभवनाच्या प्रांगणात जे काय होतं ते अत्यंत गंभीर आहे.. जर का लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आता आणण्यापर्यंत मजल जात असेल, तर मग शेवटी विधानभवनाचं महत्त्व राहीलं काय?'' असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

तर ''त्यांचं व्यक्तिगत काही असेल, तो त्यांचा मुद्दा आहे पण हे विधानभवन आहे, येथे कडेकोट बंदोबस्त असताना देखील हे पास घेवून आले होते का? पास दिले गेले असतील, ते कोणाच्या मार्फत दिले गेले त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे.'' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी विधिमंडळाच्या आवारात घडलेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT