ulhasnagar corporation businessman meeting vote awareness Sakal
मुंबई

Ulhasnagar : मतदान केल्याची निशाणी दाखवा आणि 5 ते 10 टक्के डिस्काऊंट मिळवा; व्यापाऱ्यांचा पालिकेतील बैठकीनंतर निर्णय

व्यापाऱ्यां सोबतच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी दुकानात येणाऱ्या ग्राहकांसोबत मतदान जनजागृती करावी अशी हाक उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : व्यापाऱ्यां सोबतच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी दुकानात येणाऱ्या ग्राहकांसोबत मतदान जनजागृती करावी अशी हाक उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.मात्र पालिकेच्या या हाकेला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देतानाच ग्राहकांनी मतदान केल्याची निशाणी दाखवल्यावर त्यांना विविध वस्तूंवर 5 ते 10 टक्के डिस्काऊंट देण्याचा आगळावेगळा निर्णय घेतला आहे.

आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय उपायुक्त किशोर गवस यांनी येणाऱ्या 20 मे रोजी होत असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतदान जनजागृती करण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते.

त्यात दुकानात महानगरपालिने तयार केलेले स्टिकर्स लावून आणि येणाऱ्या ग्राहकांना ही स्टिकर्स देऊन जनजागृती करावी.तसेच कोणत्या उमेदवाराला मतदान करावे असा प्रचार करू नये,मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी या जनजागृती मोहिमेत सहभागी व्हा अशा सूचना देण्यात आल्या.

यावेळी सहायक आयुक्त गणेश शिंपी,अनिल खतुरानी,दत्तात्रय जाधव,व्यापारी असोसिएशनचे ज़िलाध्यक्ष जगदीश तेजवानी,नरेश थरवानी,दिनेश कुंग,महेश पुरस्वानी,किशोर सजनानी,दिलीप शर्मा,अजय चिमनानी,सनी जाधवानी,जयकिशन पारवानी,दीपक छतलानी यांच्यासह जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,निवडणूक विभागाचे विशाल कदम तसेच अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या जनजागृती प्रचार सभेत सहभाग घेतला.

""मतदान करणाऱ्यांना 5 ते 10 टक्के डिस्काऊंट""

आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार मुख्यालय उपायुक्त किशोर गवस यांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले.त्यावर जे मतदार मतदान केल्याची निशाणी बोटावर दाखवतील त्यांना विविध वस्तूंवर 5 ते 10 टक्के डिस्काऊंट देण्याचा आगळावेगळा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जगदीश तेजवानी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT