मुंबई

उल्हासनगरातील शासकीय महिला प्रसूतिगृहाचे रूपांतर कोविड-19 रुग्णालयात

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर - एकमेव कोरोना पॉझिटिव्ह ठरलेली महिला आणि तिच्या संपर्कात असलेले सर्व जण ओके ठरल्यावर अधिक दक्षता म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेने कोरोनावर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी शासकीय महिला प्रसूती गृहाचे रूपांतर कोविड-19 रुग्णालयात करण्यात आले आहे.त्यात 50 बेड्स आणि 5 व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ही माहिती दिली.

शासकीय महिला प्रसूतिगृह हे कॅम्प नंबर 4 च्या मुख्य बाजारपेठेच्या रोडवर असून ही इमारत तीन मजल्याची आहे.या संपूर्ण इमारतीचे सॅनिटायझिंग करण्यात आले आहे.यामध्ये शहरातील कोरोनाची संशयित लागण झालेल्या रुग्णांना  ठेवण्यात येणार आहे.प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची कॅम्प नंबर 3 मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सोय करण्यात आली आहे.असे सांगतानाच कोविड-19 रुग्णालयात सोई सुविधा उभारण्यासाठी मोठा खर्च असल्याने दानशूर लोकांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन देखील आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे केले आहे.

मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर,सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी,मुख्य स्वच्छता अधिकारी विनोद केणे,एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत इमारतीचे सॅनिटायझिंग केले जात आहे. कोविड-19 या रुग्णालयात येणाऱ्या संशयित कोरोना रुग्णांवर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुधाकर शिंदे, प्रसूतिगृहाच्या अधिक्षिका डॉ. भावना तेलंग, उल्हासनगर पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुहास मोहनाळकर,डॉ.राजा रिजवानी व कामगार हॉस्पिटलचे डॉक्टर उपचार करणार आहेत.

दरम्यान आयुक्त देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला सर्वप्रथम स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी प्रतिसाद दिला आहे.वधारिया यांनी कोविड-19 या रुग्णालयासाठी त्यांना मिळणारा मार्च महिन्यातील 30 हजार रुपये वाहन भत्ता व 10 हजार रुपये मानधन असे 40 रुपये दिले आहेत.

ulhasnagar government delivery center is now turned into covid 19 hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून केवळ २७ प्रमाणपत्रांचं वाटप; सरसकट आरक्षण नाहीच, दिशाभूल कोण करतंय?

Nashik Post : आनंदाची बातमी! टपाल विभागाकडून आता कॅनडा, अमेरिकेतही पोचणार दिवाळी फराळ!

Latest Marathi News Live Update : राजनाथ सिंह यांची पुण्यात डीआरडीओच्या तोफखाना प्रदर्शनाला हजेरी

Health Care: निरोगी आरोग्यासाठी वर्षात दोनदा आरोग्य तपासणी करा, डॉक्टरांचा आरोग्यमंत्र

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस 'ज्ञानोत्सव' म्हणून साजरा!

SCROLL FOR NEXT