mumbai sakal
मुंबई

उल्हासनगर : लाच घेताना कनिष्ठ अभियंत्यास अटक

नवीन मिटरसाठीची वसूली महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : नवे वीज मीटर बसवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यात एका प्रशिक्षणार्थी वायरमनचा समावेश आहे.

रवींद्र पाटील यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. पाटील हे महावितरणचे परवानाधारक ठेकेदार आहेत. त्यांनी श्रीमलंग भागात राहणाऱ्या सुलोचना पावशे यांच्या व्यावसायिक दोन गाळ्यांत वीज मीटर बसवून देण्याचे काम घेतले होते. महावितरणचे कनिष्ठ अभियंता बसवराज बाबनगरे यांच्याकडे या परिसराचा कार्यभार असल्याने त्यांनी प्रशिक्षणार्थी वायरमन गणेश दळवी यांच्यामार्फत मीटर बसवून देण्यासाठी पाटील यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

लाच प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलिस निरीक्षक सुषमा पाटील यांनी नेवाळी फाट्यावर सापळा रचून बाबनगरे यांच्यावर कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Latest Marathi News Live Update : राजीव गांधी भवन परिसरात संतापजनक प्रकार, चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर पतीचा हल्ला

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

Ricky Ponting: पंजाब किंग्जची भारतातील स्टार्सभोवती धाकटी संघरचना, पाँटिंगचा दमदार प्लॅन!

SCROLL FOR NEXT