Ulhasnagar News sakal
मुंबई

Ulhasnagar News: ..अन् बोलु लागल्या शहराच्या भिंती; उल्हासनगर महानगरपालिकेचा उपक्रम

Ulhasnagar News : Pictures are being created on the walls of hospitals to create awareness about cleanliness and health care

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात आणि राज्यात प्रगतीच्या आकडेवारीची झेप घेणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेने शहर सौन्दर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून आगेकूच केली आहे.त्यासाठी विविध सकारात्मक संदेशाच्या चित्रांनी भिंतींना साकारण्यात येत आहे.त्यामुळे अबोल दिसणाऱ्या भिंती आता चित्रांतून बोलू लागल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे.

महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशान्वये शहर अभियंता संदीप जाधव,उद्यान अधिक्षिका दिप्ती पवार यांच्या देखरेखीखाली सरकारी व सोसायट्यांच्या भिंतींवर संतांचे संदेश,कविता.उद्यान,शाळा,महाविद्यालयांच्या भिंतींवर शिक्षणाशी संबंधित विषयांचे चित्र.उद्यानाच्या भिंतींवर खेळ आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे चित्र

.रुग्णालयांच्या भिंतींवर स्वछता व आरोग्य सेवा यासंबंधीची जाणीव करुन देणारी चित्रे साकारण्यात येत आहेत.त्यामुळे ह्या भिंती बोलक्या झाल्या असून नागरिक कुतूहलाने थांबून भिंतींवर चित्रे व संदेश वाचताना दिसत आहेत.

याशिवाय मोक्याचे चौक देखील चकाचक करण्याचे काम सुरू असून त्यांना रेडियमने वलयांकित करण्यात आल्याने हे चौक उजळून निघाले आहेत.नागरिकांत शहरा विषयी सकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी

विविध नियोजनाद्वारे शहराचे सौदर्यीकरण जास्तीत जास्त वाढवण्याचे महानगरपालिकेचे प्रयास असल्याची माहिती उद्यान अधिक्षिका दिप्ती पवार यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT