Ulhasnagar News esakal
मुंबई

VIDEO : भाजप आमदारासमोरच पदाधिकारी एकमेकांना भिडले; शिवीगाळ करत घातला गोंधळ, वादाचा व्हिडिओ व्हायरल

भाजप आमदार कुमार आयलानी (BJP MLA Kumar Ailani) यांच्या समोरच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यानं शिवीगाळ केलीये.

शर्मिला वाळुंज

उल्हासनगरमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात पटत नसल्याचं दिसून येतं आहे.

डोंबिवली : भाजप आमदार कुमार आयलानी (BJP MLA Kumar Ailani) यांच्या समोरच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यानं शिवीगाळ केलीये. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि माजी नगरसेवक महेश सुक्रमानी यांना भाजप कार्यकर्ता लकी नाथानी यानं शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलाय.

याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळं उल्हासनगरमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात पटत नसल्याचं दिसून येतं आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि माजी नगरसेवक महेश सुक्रमानी यांना भाजप कार्यकर्ता लकी नाथानी यानं शिवीगाळ केली आहे. भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडत असताना आयलानी यांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, लकी नाथानी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं सुक्रमानी यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचं दिसून आलं. उल्हासनगरमधील कॅम्प २ मधील ओटी सेक्शन भागात भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी लकी हा आपल्या घरातून फोटो काढत होता.

यावेळी माजी नगरसेवक सुक्रमानी यानं त्याला घरून काय फोटो काढतो, खाली ये असं सांगितलं. याचा राग लकीला आला आणि त्यानं गोंधळ घातला. भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडत असतांना आयलानी यांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, लकी नाथानी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. याचं वादाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून याप्रकरणी भाजपकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळं उल्हासनगरमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात पटत नसल्याचं दिसून येतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT