Ulhasnagar News sakal
मुंबई

Ulhasnagar News: सेवनिवृत्तीला आठवडा बाकी असतानाच उल्हासनगर पालिका आयुक्त झाले आयएएस

281 अधिकाऱ्यांत 13 वा क्रमांक पटकावल्याने ते दिल्ली येथे होणाऱ्या युपीएससी बोर्डच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते |By securing 13th rank out of 281 officers, he qualified for the UPSC Board Examination held at Delhi.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News| सेवनिवृत्तीला अवघा एक आठवडा बाकी असतानाच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख हे आयएएस झाले आहेत.त्यामुळे त्यांना थेट दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

नोव्हेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती साठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन लेखी परिक्षेत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी बाजी मारली होती.शेख यांनी 281 अधिकाऱ्यांत 13 वा क्रमांक पटकावल्याने ते दिल्ली येथे होणाऱ्या युपीएससी बोर्डच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

29 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीकरीता बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची 100 गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा आय.बी.पी.एस.मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आली होती.सदर परीक्षेसाठी 281 अधिकारी उपस्थित होते.या परीक्षेचा निकाल लागल्यावर त्यात 51 गुण मिळवून आयुक्त अजीज शेख यांचा 13 वा क्रमांक लागला होता.

या परिक्षेत प्रथम 20 मध्ये येणारे अधिकारी पुढील आठवड्यात दिल्ली होणाऱ्या युपीएससी बोर्डच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.त्यात अजीज शेख यांचाही समावेश होता

अजीज शेख हे 1994 बॅचचे अधिकारी असून त्यांनी नागपूर,मिरा भाईंदर,कल्याण डोंबिवली,नवी मुंबई या महानगरपालिकेत उपायुक्त पदभार हाताळला आहे.काही वर्षांपूर्वी त्यांची पदोन्नती झाल्यावर त्यांची धुळे महानगपालिकेत आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.अजीज शेख हे 13 जुलै 2022 पासून उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार हाताळत आहेत.

""31 मे रोजी होता अजीज शेख यांच्या सेवनिवृत्तीचा कार्यक्रम"

अजीज शेख यांना 58 वर्ष पूर्ण झाल्याने 31 मे रोजी त्यांच्या सेवनिवृत्तीचा कार्यक्रम हा शहीद जनरल अरुणकुमार वैद्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता.आता आयएएस झाल्याने त्यांना मुदतवाढ मिळाली असून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपआयुक्त किशोर गवस,डॉ.सुभाष जाधव,सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT