Alcohol production in Ulhasnagar sakal media
मुंबई

उल्हासनगर पालिकेच्या वास्तूत हातभट्टी दारूचा अड्डा; पोलिसांनी टाकली धाड

दिनेश गोगी

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या (ulhasnagar municipal corporation) खाली वास्तूत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा (Alcohol production) थाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिका आणि पोलिसांनी (Municipal and police action) धाड टाकून हा अड्डा उध्वस्त केला आहे. त्याठिकाणी असलेले दोन भरलेले कॅन, ग्लास, बाक जप्त करण्यात आले असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पालिका मुख्यालयाच्या मागेच अग्निशमन दलाच्या बाजूला पालिकेच्या मालकीचे प्रशस्त असे जुने जकात नाक्याचे कार्यालय आहे. जकात सुरू असताना कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर हे कार्यालय हाताळत होते. महाराष्ट्र शासनाने जकात बंद केल्यावर तीनचार वर्षांपूर्वी याठिकाणी श्वानांवर नसबंदीची प्रक्रिया हाताळली जात होती. मात्र हे कामही निविदे अभावी ठप्प पडल्याने जकात नाका बंद आहे.

त्याचा गैरफायदा घेणाऱ्या काहींनी याठिकाणी बाक टाकून गावठी हातभट्टी दारूचा अड्डा थाटला होता. ही माहिती समजताच आज दुपारच्या सुमारास मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, सहायक आयुक्त तुषार सोनवणे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांसोबत धाड टाकली त्यावेळी तळीरामांनी पळापळ केली. पोलिसांनी घटनास्थळी स्टीलचे लहान ग्लास, हातभट्टी दारूचे दोन भरलेले कॅन, मग मिळाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाताळली जात असून पालिकेच्या वास्तूत अड्डा ठरणाऱ्यांना अटक करण्यात येणार अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT