हृदय पिळवटून टाकणारी घटना! पत्नीच्या अंत्यसंस्काराला जाता न आल्याने पतीने अलगीकरण केंद्रातच... 
मुंबई

हृदय पिळवटून टाकणारी घटना! पत्नीच्या अंत्यसंस्काराला जाता न आल्याने पतीने अलगीकरण केंद्रातच...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे जीवाभावाच्या नात्यांची ताटातुट होत आहे. अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना मुलुंड येथील पालिकेच्या अग्रवाल रुगणालयात घडली. पत्नीचे रुगणालयात निधन झाल्यानंतर अलगीकरणात असलेल्या पतीला तीच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही. पत्नीला अखेरचे पाहताही आले नाही. या जीवघेण्या दुःखाने अलगीकरण केंद्रात मध्ये पतीन हंबरडा फोडला. या अक्रोशाने आणि पती पत्नीच्या या ताटातूटीने अनेकांचे हृदय हेलावले. 

ठाण्याच्या तीन हात नाका परिसराला कोरोनाचा विळखा पडला आहे. हा परिसर ठाणे आणि मुलुंडच्या मध्यावर आहे. मधुमेहाने आजारी असलेल्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली होती. उपचारासाठी त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने त्यांना मुलुंड येथील आगरकर रुगणालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान पतीसह दोन मुले कोरोना बाधीत आल्याने त्या सर्वांना जवळच्या अलगीकरण केंद्रात दाखल केले होते. अगरवाल रुग्णालयातच पाचव्या दिवशी पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान ज्या दिवशी पत्नीचा मृत्यू झाला त्या दिवशी विद्युत दाहिन्यांमध्ये आधीच प्रेतांचा खच पडलेला असल्याने रुग्णालयाने मृतदेह रुग्णालयातच ठेवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

मुलगा आणि नातेवाईंकांनी केले अंत्यसंस्कार 
अलगीकरणात असलेल्या पतीला अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी मिळू शकली नाही. या दुःखाने पतीने अलगीकरण केंद्रातच हंबरडा फोडला. कोरोना चाचणीत निगेटिव्ह आलेल्या एक मुलगा आणि काही नातेवाईक यांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. मात्र कोरोनाने पती पत्नीची अशी ताटातूट केली  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT