मुंबई

व्वा ! असं काही पाहिलं की खूप भारी वाटतं.. अजिबात चुकवू नका !

शर्मिला वाळुंज

ठाणे : 'पर्यावरण बचाव'चा संदेश देण्याचे काम अनेकजण करतात. मात्र, हा संदेश आपल्या कृतीतून पोहचविण्याचा प्रयत्न करणारे विरळाच. बदलापूर येथील गिरीश त्रिवेदी यांनी मात्र पर्यावरण संवर्धनाचा वसा आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेतही जोपासला आहे.

लग्नपत्रिका देखणी, आकर्षक करण्याचा उत्साह प्रत्येक घरामध्ये पहायला मिळतो. परंतु, त्रिवेदी यांनी चक्क वहीच्या मुखपृष्ठावर आमंत्रणपत्रिका छापून लग्नानंतरही या आमंत्रणाचा पर्यावरणपूरक वापर कसा होईल हे पाहिले आहे. ही "आमंत्रणवही' पाहिल्यानंतर, प्रत्येक जण त्याचे कौतुक करत आहेत. 

मुळचे राजस्थानचे असलेले आणि बदलापूर येथे रहाणारे गिरीश त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याचा विवाह नुकताच पार पडला. गिरीश त्रिवेदी यांचे वडील वसंत त्रिवेदी हे स्वातंत्र्यसैनिक होते. पर्यावरणपूरक दृष्टीने, तसेच पेपरलेस लग्नपत्रिका आपल्या मुलाची असावी हा विचार पहिल्यापासूनच गिरीश यांच्या मनात घोळत होता.

आजकाल लग्नपत्रिकेवर वारेमाप पैसे खर्च केले जातात. ही महागडी लग्नपत्रिका हातात पडल्यावर त्या वेळेपुरते केवळ त्या लग्नपत्रिकेचे कौतुक होते व लगेच तिचे रुपांतर रद्दीमध्ये होते. आपल्या मुलाची लग्नपत्रिका रद्दी न होता तिचा वापर व्हावा यादृष्टीने ती वहीवर छापण्याची संकल्पना मी मांडली आणि त्याला घरातल्यांनीही पसंती दर्शविल्याचे त्रिवेदी यांनी सांगितले. 

गुजराती आणि मराठी अशा दोन भाषांत ही पत्रिका छापण्यात आली आहे. साधारण एका पत्रिकेला 30 रुपये खर्च आला. या पत्रिकेमध्ये वधू-वरांच्या नावासह घरातील तीनही पिढ्यांच्या नावांचा उल्लेख आलेला आहे. विशेष करून वराच्या वडिलांच्या पालकांच्या नावासोबतच आईच्याही पालकांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.

सहसा कोणीही पत्नीच्या आई-वडिलांचे नाव छापत नाही. परंतु, घरातील महिला ही घराचा मुख्य आधार असून त्यांचे पालनपोषण करणाऱ्या पालकांनाही आपण आदराने स्थान दिले पाहिजे, अशी माझी भावना असल्याचे त्रिवेदी सांगतात. 

WebTitle : unique concept of wedding invitation with eco friendly message

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात अन तक्रारींचा पाऊस; नऊ दिवसात तब्बल १२०० तक्रारी

Wagholi Accident : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापाऱ्याचा बळी; घसरून पडले, सेफ्टी टँकरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

​Kannad News : मुंगसापूरच्या बापु महाराजाच्या आश्रमावर FDA चा छापा; बोगस औषधविक्री संशयावरून कारवाई,'महाराज' हिमालयात गेल्याचा मॅनेजरचा दावा

SCROLL FOR NEXT