indian airforce 
मुंबई

कोरोना योद्धांना भारतीय हवाई दलाकडून अनोखी मानवंदना

सकाळवृत्तसेवा

मुंबादेवी : कोरोना संकटाविरोधात गेल्या दीड महिन्यापासून झुंज देणारे डॉक्टर, नर्स, वाॅर्डबॉय, आया, सफाई कामगार यांच्या सन्मानार्थ जे. जे रुग्णालयावर सैन्य दलातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली. सैन्यदलाची विमाने आणि हेलिकाॅप्टरने आज सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान रुग्णालयावर पुष्पवृष्टी करत सैन्याने या कोरोना योद्धांना अनोखी मानवंदना दिली.  

गेल्या दीड महिन्यापासून मुंबईत संपुर्ण लाॅकडाऊन आहे. कोरोनाला विषाणूला अटकाव करण्यासाठी आणि कोरोना बाधितांच्या सेवेसाठी डाॅक्टर, नर्ससह सर्व वैदकिय कर्मचारी आणि सफाई कामगार अहोरात्र झटत आहेत; तर रस्त्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलही 24 तास तैनात आहे. या सर्व लढाईत आम्ही आपल्यासोबत आहोत, असा विश्वास कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी तसेच या लढाईतील प्रत्येक सेवकाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी  सुखोई विमाने आणि हॅलिकाॅप्टरद्वारे सैन्याने ही पुष्पवृष्टी केली.  

जेजे रुग्णालय परिसरातील तसेस उमरखाडी, डोंगरी,चारनळ, भेंडीबाज येथील नागरिकांनी आपल्या गच्चीवरुन या विमानांची ही दृश्ये कॅमेऱ्यात टिपली.

Unique salute from Indian Air Force to Corona Warriors

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT