मुंबई

Unmasking Happiness | राज्यातील 50 टक्के कोरोना मृत्यू सहव्याधींनी; 46.7 टक्के जणांचा उच्च रक्तदाबाने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : राज्यात शनिवारपर्यंतचा कोव्हिडच्या मृतांचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे; मात्र यातील ५० टक्के मृत्यू कोव्हिडसह इतर सहव्याधी असणारे आहेत. राज्यातील १० पैकी सात जणांच्या मृत्यूंमध्ये कोव्हिडसह इतर व्याधी होत्या. त्यातीलही अर्धे मृत्यू दोन गंभीर आणि उच्च जोखीम असलेल्या आजारांमुळे झाले आहेत, असा निष्कर्ष आरोग्य विभागाने केलेल्या निरीक्षणातून समोर आला आहे.

कोव्हिडमुळे बळी पडलेल्यांपैकी ४६.७ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब, तर ३९.४ टक्‍क्‍यांमध्ये मधुमेह होता. उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन गंभीर आणि उच्च जोखमीचे आजार आहेत. त्यामुळे या अतिजोखमीच्या आणि गंभीर रुग्णांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी जास्तीत जास्त मृत्यू ६०-६९ वयोगटातील लोकांमध्ये नोंदवण्यात आले, तर प्रत्येक पाचव्या व्यक्तीचा मृत्यू पन्नाशी आणि सत्तरी पार केल्यामुळे झाला आहे. यात उच्च रक्तदाब सर्वाधिक सामान्य सहव्याधी (४६.७ टक्के) आणि दुसरा प्रमुख आजार म्हणजे मधुमेह ३९.४ टक्के आहे. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही दोन प्रमुख कारणे आहेत. फक्त ११
टक्के लोकांना हृदयविकार असल्याची नोंद आहे.
देशाच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. भारत मृत्यूंच्या तुलनेत जगात तिसऱ्या क्रमांकांवर आहे. याचा अर्थ कोव्हिडमुळे होणारा प्रत्येक तिसरा मृत्यू हा महाराष्ट्रात होत आहे.

कोव्हिडमुळे झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू पुरुषांचे आहेत. मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण ६९.८ टक्के आहे. म्हणजे ३४,४९९ एवढे मृत्यू झाले आहेत. दरम्यान, ३०.२ टक्के महिलांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आधी मृत्यूंचे प्रमाण जास्त होते; मात्र गेल्या दोन महिन्यांत या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. डिसेंबरमध्ये मृत्युदर दोन टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे.
- डॉ. प्रदीप आवटे,
राज्य सर्वेक्षण अधिकारी

-------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT