Yogi Adityanath Mumbai Bulldozer esakal
मुंबई

Yogi Adityanath : 'बुलडोजर' शांततेचं प्रतीक म्हणून सिद्ध होऊ शकतं; मुंबईत असं का म्हणाले CM योगी?

सीएम योगींना 'बुलडोजर बाबा' म्हणूनही ओळखलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

बुलडोजर हे शांतता आणि विकासाचं प्रतीक असू शकतं. कारण, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.

UP Global Investors Summit 2023 : बुलडोजर हे शांतता आणि विकासाचं प्रतीक असू शकतं. कारण, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी व्यक्त केलं.

मुख्यमंत्री योगी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Yogi Adityanath Visit Mumbai) आहेत. योगींना 'बुलडोजर बाबा' म्हणूनही ओळखलं जातं. देशांतर्गत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री योगी म्हणाले, बुलडोजर (Bulldozer) पायाभूत सुविधांसाठी आणि विकासकामांमध्ये महत्वाची भूमिका बजावतं म्हणून ते शांतता आणि विकासाचं प्रतीक आहे. जर लोकांनी कायद्याचं उल्लंघन केलं तर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जाऊ शकतो. यूपीमध्ये गुन्हेगारांची मालमत्ता उद्ध्वस्त केल्यामुळं योगींना 'बुलडोजर बाबा'चा टॅग मिळाला आहे.

'मुंबई अर्थभूमी तर उत्तर प्रदेश धर्मभूमी आहे'

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं केलेल्या आरोपांबाबत विचारले असता मुख्यमंत्री योगी म्हणाले, मुंबई ही देशाची राजधानी आहे. अर्थभूमी आहे, तर उत्तर प्रदेश ही धर्मभूमी आहे. दोन्हींचा सुंदर मिलाफ असू शकतो. आम्हाला मुंबईची फिल्मसिटी हिरावून घ्यायची नाहीये, तर स्वतःची फिल्मसिटी उभारायचीये. याचं काम प्रगतीपथावर असून काही टॉप स्टुडिओंनी येण्यास स्वारस्य दाखवलंय. यूपीची फिल्म सिटी 1200 एकरमध्ये पसरलीये, तर गोरेगाव सुमारे 520 एकरमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT