भाज्यांचे दर चढेच
भाज्यांचे दर चढेच sakal
मुंबई

कोविड प्रादुर्भावामुळे फुले, फळे, भाज्यांचे आगामी प्रदर्शन रद्द

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात प्रतिवर्षी फेब्रुवारी महिन्यात फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येते. त्यामध्ये देशभरातून प्रतिनिधी सहभागी होतात. तथापि, कोविड विषाणू प्रादुर्भावामुळे फेब्रुवारी- 2022 मधील फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सदर प्रदर्शन जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरवण्यात येते. प्रदर्शनाचा कालावधी तीन दिवसांचा असतो. या तीन दिवसात अंदाजे दोन ते तीन लाख नागरिक व शाळकरी मुले या प्रदर्शनाला भेट देतात. त्यासोबत प्रदर्शन पाहण्यासाठी विविध मान्यवर तसेच नामांकित मंडळीदेखील आवर्जून भेट देतात. (Mumbai News)

सद्यस्थितीत सर्वत्र कोविड विषाणूचा प्रादुर्भाव कायम असून मुंबईसह देशभराने संसर्गाच्या दोन लाटा अनुभवल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष प्रदर्शनात सातत्याने एकत्र येणे हे कोविड संसर्गाच्या दृष्टीने धोक्याचे ठरु शकते. तसेच, प्रत्यक्ष प्रदर्शनाच्यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिकांनी येणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रदर्शन रद्द केल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT