UPSC Result 2024
UPSC Result 2024  Sakal
मुंबई

UPSC Result 2024 : उल्हासनगरातील आंबेडकरी चळवळीतील नेत्याचा मुलगा आयएएस, अभिषेकची IRPS वरून IAS पदावर झेप

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर-आंबेडकरी चळवळीतील नेते माजी नगरसेवक प्रमोद टाले यांचा मुलगा अभिषेक टाले यांनी दुसऱ्यांदा दिलेल्या यूपीएससी परीक्षेत आयआरपीएस वरून आयएएस पदावर झेप घेतली आहे.या यशाबद्दल अभिषेक वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

उल्हासनगरातील सुभाष टेकडी,कानसई रोड परिसरात राहणारा अभिषेक टाले यांनी 2016 साली यूपीएससी परीक्षेत 800 वा क्रमांक पटकावला होता.केंद्र सरकारने त्याची आयआरपीएस अर्थातच इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस या पदावर नियुक्ती केली होती.अभिषेकने या पदावर 4 वर्षे लखनऊ डिव्हिजन इंचार्ज व गेल्या वर्षभरापासून पंजाब फिरोजपुर डिव्हिजन इंचार्ज म्हणून काम पाहिले आहे.

मात्र अभिषेक याची जिद्द इंडियन ऍडमिस्टेटीव्ह सर्व्हिस अर्थात आयएएस सेवेत यायची असल्याने त्याने पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली.या परिक्षेचा निकाल लागला असून अभिषेक याने त्यात 249 वा नंबर मिळवून त्याचे आयएएस चे स्वप्न पूर्ण केले आहे. प्रमोद टाले यांची मुलगी अक्षता टाले ही नाट्यक्षेत्रात अभिनेत्री आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

Latest Marathi News Live Update: ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.08 टक्के..

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

SCROLL FOR NEXT