मुंबई

कल्याणचे नाराज नगरसेवक स्थायी समिती सभेत गैरहजर 

सकाळवृत्तसेवा

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापतिपद डोंबिवलीच्या पदरात पडल्याने नाराज झालेले कल्याणमधील दोघे नगरसेवक बुधवारी स्थायी समितीच्या सभेला गैरहजर राहिले. नवीन सभापती निवडीनंतर स्थायी समितीची बुधवारी पहिली सभा झाली. या सभेत गणेश कोट आणि जयवंत भोईर हे दोघे हजर राहतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

कोट आणि भोईर यांनी पालिका सचिवांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले होते. त्यामुळे आगामी महासभेत याबाबतचा प्रस्ताव पटलावर येतो की शिवसेना पक्ष अंतर्गतच समजूत काढून या दोघांची मनधरणी करतो, ते पाहावे लागले. राजीनामे मंजूर झाल्यास नवीन सदस्यांची वर्णी लागू शकते. स्थायी समितीच्या पुढील सभेची तारीख निश्‍चित होईपर्यंत सेनेला या राजीनामानाट्यावर मार्ग काढणे क्रमप्राप्त ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT