मुंबई

शिवसेना भाजपाला झटका देणार? दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: पुढच्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात होणारी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपा (Bjp) मागच्या काही महिन्यांपासून अन्य पक्षातील प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात स्थान देत आहे. मुंबई जिंकण्यासाठी भाजपाला मराठी मतांबरोबर (Marathi voters) उत्तर भारतीय मतांची (north indian votes) सुद्धा आवश्यकता आहे. त्यासाठी भाजपाने मध्यंतरी कृपाशंकर सिंह यांना पक्षात प्रवेश दिला. ते पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आहेत.

उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मत मिळवण्याची भाजपाची रणनीती आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने सुद्धा आता तशीच रणनीती अवलंबली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि नगरसेवक यशवंत जाधव यांनी लवकरच भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा त्यांनी दावा केला. मुंबईतील भाजप नगरसेवक पक्षात नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

आता भाजपमधील नाराज उत्तर भारतीय नेत्यांवर आता शिवसेनेचा डोळा आहे. भाजपमधील काही नाराज उत्तर भारतीय नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिवाळी नंतर शिवसेना राजकीय फटाके फोडण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये नव्याने आलेल्या उत्तर भारतीय नेत्यांमुळे भाजपमधील जुने उत्तर भारतीय नेते नाराज आहेत. या नाराज उत्तर भारतीय नेत्यांशी शिवसेनेचे नेते संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भाजपमध्ये नव्याने आलेल्या उत्तर भारतीय नेत्यांमुळे  अडगळीत पडल्याची भावना काही उत्तर भारतीय नेत्यांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Sambit Patra: 'भाजप नेते मोदींना देवाच्या वरती समजू लागले'; संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा

Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

Latest Marathi News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीलचे 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

SCROLL FOR NEXT