मुंबई

शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा तो फोन कॉल ठरला महत्त्वाचा

पूजा विचारे

मुंबईः  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. पक्ष प्रवेशानंतर उर्मिला यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी केलेल्या फोनबद्दल सांगितलं आहे. 

काँग्रेसकडून आलेली विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातील उमेदवारीही उर्मिला यांनी नाकारली होती.  शिवसेनेने उर्मिला यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून उमेदवारीची ऑफर दिली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन केल्यानंतर त्यांनी विधान परिषदेसाठी होकार दिला होता. 

त्या फोनमध्ये काय म्हणाले होते उद्धव ठाकरे 

'आपली जी विधान परिषद आहे महाराष्ट्राची. त्या महाराष्ट्राची परंपरा ही इतकी मोठी आहे की, त्याच्या मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचं सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण की ही परिषद, या ज्या जागा आहेत, जी भवनं आहेत. त्याच्यात जायला लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याचा दर्जा खूप वाढायला पाहिजे आणि त्याच्याकरिता तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे.'

उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा हे म्हणाले आणि विचारचं मला पहिल्यांदा खूप आवडले. तसंच त्यांनी माझा नावाचा विचार केला यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, असंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात.

२०२२ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडतायत. या पार्श्वभूमीवर उर्मिला यांचा आज शिवसेनेत झालेला पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. भारतीय जनता पक्षाकडून २०२२ मुंबई महापालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या २०२२ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर उर्मिला यांचा पक्षप्रवेश शिवसेनेची ताकद वाढवणारा मानला जातोय.

Urmila Matondkar told about happened the phone call made by Uddhav Thackeray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT