high court  
मुंबई

ऊर्वशी चुडावालाला अटकेपासून दिलासा 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेल्या शेरजिल इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या ऊर्वशी चुडावालाला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला. ऊर्वशीच्या विरोधात आझाद मैदान पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे. 

या प्रकरणात ऊर्वशीने अटक होण्याच्या शक्‍यतेमुळे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आज न्या. संदीप शिंदे यांच्यापुढे सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने ऊर्वशीला मुंबई आणि ठाणे परिक्षेत्राबाहेर जाऊ नये, मोबाईल फोन पोलिसांकडे सुपूर्द करावा आणि पोलिस चौकशीला उद्या आणि परवा (ता. 12 आणि 13) सकाळी अकरा ते दोन या वेळेत हजर राहावे, असे आदेश दिले. तसेच त्यानंतर पोलिस जेव्हा बोलावतील, तेव्हा हजर व्हावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी अटक केल्यास 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात-मुचलक्‍यावर सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. घोषणाबाजीमधून अर्जदाराची विचारधारा स्पष्ट होत नाही, असे मतही न्यायालयाने नोंदविले. 

आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनावेळी ऊर्वशीने शेरजिलच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. याविरोधात पोलिसांनी राष्ट्रद्रोहासह विविध आरोपांखाली गुन्हा नोंदविला आहे. तसेच ऊर्वशीने तिचे समाजमाध्यमावरील खाती बंद करून पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पोलिसांनी केला. मात्र, कोणत्याही प्रकारची देशविरोधी मानसिकता नसून केवळ समाजमाध्यमावरील पोस्ट मी शेअर केली होती, मी कोणतीही पोस्ट केली नाही, असा बचाव तिच्या वतीने करण्यात आला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
---- 
मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता नाही 
दरम्यान, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी उच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे. यानुसार जिल्हा विधी अधिकारी आणि सरकारी वकिलांचे मत असणे आवश्‍यक आहे. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केली नसल्याचे मत न्यायालयाने आज सुनावणीत व्यक्त केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT