One crore fraud the lure of profits sanitizer mask business sakal
मुंबई

नवी मुंबई : वैज्ञानिक असल्‍याचे सांगून कंपन्यांना लाखो रुपयांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : तमिळनाडूत राहणाऱ्या वाय. जी. शेखर नावाच्या व्यक्तीने भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये (Bhabha Atomic Research Center) सहायक वैज्ञानिक असल्याचे भासवून बीएआरसी व बीआरआयटी या प्रशासनाचा बनावट लोगो, प्रमाणपत्र (fake logo and certificate) तयार केले आणि खाद्यपदार्थाची निर्यात करणाऱ्या काही कंपन्यांची दिशाभूल करून तब्बल १० लाख ६० हजार रुपये (Money Fraud) उकळले. बीआरआयटीने दिलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी वाय.जी. शेखर याच्याविरोधात फसवणुकीसह बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला आहे.

बीएआरसीअंतर्गत असलेल्या बीआरआयटी या संस्थेकडून खाद्यपदार्थातील अणू किरणोत्सर्गाची (रेडिओ ॲक्टिव्हिटी) तपासणी केली जाते. तसेच खाद्य पदार्थाची विक्री व निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शुल्क आकारून भारत सरकार व परमाणू ऊर्जा विभाग तसेच बीआरआयटीचे अधिकृत लोगो असलेल्या छापील प्रमाणपत्र देण्यात येते. सदर प्रमाणपत्रावर मालाबाबतचे रासायनिक विश्लेषण छापून त्याबाबतचा तपासणी अहवाल संबंधित कंपनीला देण्यात येतो. ही सर्व प्रक्रीया बीआरआयटी या संस्थेकडून करण्यात येते.

मात्र वाय.जी. शेखर या व्यक्तीने बीआरआयटी या संस्थेकडून खाद्य पदार्थातील अणू किरणोत्सर्गाची तपासणी करून देण्यात येणारे बनावट प्रमाणपत्र तयार केले. तसेच बीएआरसीमध्ये सहायक वैज्ञानिक असल्याचे भासवून सदरचे प्रमाणपत्र खाद्य पदार्थाची निर्यात करणाऱ्या काही कंपन्यांना देऊन त्यांच्याकडून तब्बल १० लाख ६० हजार रुपये उकळले. संबंधित कंपन्यांनी प्रमाणपत्राची अणुऊर्जा विभागाकडे खातरजमा करण्यासाठी पत्रव्यवहार केल्यानंतर बीएआरसीने बीआरआयटी या संस्थेला या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा

बीआरआयटीच्या वाशी येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी शीला मोहन यांनी तपासणी केली असता, वाय.जी.शेखर याने भारत सरकारचे अशोकस्तंभ व बीएआरसी व बीआरआयटी या प्रशासनाचा बनावट लोगोचा वापर केलेले बनावट प्रमाणपत्र तयार केले आहे. तसेच हे प्रमाणपत्र खाद्यपदार्थाची निर्यात करणाऱ्या काही कंपन्यांना देऊन त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे आढळले. याप्रकरणी शीला मोहन यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शेखरवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT