Vajreshwari roads are in bad condition  
मुंबई

वज्रेश्वरी परिसरातील रस्ते दुरावस्थेत; ग्रामस्थ संतप्त

दीपक हीरे

वज्रेश्वरी : येथील जिल्ह्यातील मुख्य तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्र भर परिचित असलेले वज्रेश्वरी मार्गाचे सुरू असलेले रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम, कामासाठीच्या रस्त्याखालील ड्रेनेज व गटार वाहिनीचे काम तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष यामुळे येथील रस्ता काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. वाहतुकीची पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्राचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थ, रहिवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वाहन चालक यांची त्रेधा तिरपट उडाली. येथील जाणीव प्रतिष्ठान सामाजिक संस्थेने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून येत्या आठ दिवसात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रस्त्याची झालेली दुरावस्था, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तसेच उघडी अर्धवट गटारी यामुळे या ठिकाणी दररोज अपघात होऊन शाळकरी विद्यार्थी व भविकांना पावसाळ्यात अपघात होत आहेत. आबालवृद्ध हे या ठिकाणी चालता येत नसल्याने खड्डे मध्ये पडत आहे व वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा येऊन धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीचा हा धोका लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज प्रवासी व येथील संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

या संदर्भात येथील जाणीव प्रतिष्ठान संघटनेचे भूपेंद्र शाह, सुनील देवरे, दीपक पुजारी आदी कार्यकर्ते आक्रमक झाले असून ठाणे येथे मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

येथील वज्रेश्वरी देवी मंदिराजवळून जाणारा अंबाडी उसगांव या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम गेली दोन महिन्यांपासून सुरु आहे. तेही अर्धवट आहे. वज्रेश्वरी मध्ये सखल भाग असल्याने येथे काँक्रीटीकरण मंजूर केले आहे. गजबजलेल्या परिसरात रस्त्यामध्ये येणारे पाणी, पर्यायी मार्गाची वाणवा, सुरक्षित वाहतुकीच्या नियोजनाबाबत होणारे दुर्लक्ष व सध्याच्या रस्त्याची दुरवस्था यामुळे येथे दरररोज अपघात होण्याची मलिका सुरु आहे. या ठिकाणी रहदारी रस्ताच खराब झाल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या याच कामामुळे येथे वाहतुकीची समस्या वारंवार निर्माण होत आहे.   

येथील सरकारी दवाखाना जवळ रस्ता कडेला उघडी गटर काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडला की लगेच पाणी भरून रस्त्यावर येते. त्यामुळे या ठिकाणी अपघातची मलिका सुरु झाली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच खड्डे पडलेले आहेत. पोस्ट ऑफिस परिसरातही रस्त्याची चाळण झालेली आहे. तर येथील दळणवळण रस्त्याअभावी गेले काही दिवसांपासून ठप्प झाले आहे.

जुन्या वज्रेश्वरी बायपास रस्ता विकसित केलेला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून येथे काहीही नियोजन केले नसल्याने ही परिस्थिती उदभावली आहे. मात्र असे असताना देखील इथले लोकप्रतिनिधी कुठेही काही न बोलता मुग गिळून गप्प बसल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सत्तेसाठी एकत्र… आता एकमेकांचे शत्रू? महायुतीत कोण कुणाला पाडणार? महाराष्ट्रात पुन्हा होणार सत्तासंघर्ष, निवडणुकीनंतर काय घडणार?

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक भिसे भाजपाच्या वाटेवर

iPhone 17 Discount : TATA अर्ध्या किंमतीत विकत आहे iPhone 17! इथे लपलीये स्पेशल डील; पटकन करा बूकिंग, फक्त तीन दिवस बाकी

UP मधील बीएलओंना ‘डबल फायदा’! मानधन वाढीसोबतच SIRसाठी 2000 रुपयांपासून सुरू होणारा विशेष भत्ता

Video : मल्लिका काकूने गुंडांकरवी केला स्वानंदीच्या वडिलांवर हल्ला ; प्रोमो पाहून प्रेक्षक चिडले

SCROLL FOR NEXT