Andheri Vandalism 
मुंबई

अंधेरीच्या जाहिरात कंपनीत तुफान राडा; तोडफोड करणारे पोलिसांच्या ताब्यात

बड्या राजकीय नेत्याची जाहिरातीत करण्यात आली होती टिंगल

विराज भागवत

मुंबई: अंधेरीमधील पिनॅकल बिझनेस पार्कमध्ये एका जाहिरात कंपनीच्या कार्यालयात तुफान राडा झाला. स्टोरिया फुड्स नावाच्या जाहिरात कंपनीच्या कार्यालयात काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याची या जाहिरातीत टिंगल करण्यात आली होती. हा प्रकार त्या पक्षातील कार्यकर्त्यांना न रूचल्याने त्यांनी थेट जाहिरात कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. मुंबई पोलिसांनी याबद्दलची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतले. लॉकडाउनचे निर्बंध असल्याने कार्यालयात जास्त कर्मचारी नव्हते, मात्र पोलिस वेळेत हजर झाल्याने त्यांनी या कार्यकर्त्यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं.

या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की अंधेरी मरोळ येथील पिनॅकल बिझनेस पार्क पूर्णपणे कॉर्पोरेट बिल्डींग आहे. या बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर स्टोरिया फूड्स नावाची एक जाहिरात कंपनी आहे. त्या कंपनीने नुकतीच आपल्या एका प्रॉडक्टची जाहिरात केली. त्या जाहिरातीत त्यांनी देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्या नेत्याचे हावभाव आणि त्याची बोलण्याची लकब सारखीच ठेवत त्याची टिंगल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अशा प्रकारे आपल्या नेत्याची खिल्ली उडवली जाणं त्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना पटलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात जाऊन तोडफोड केली.

या जाहिरातीवरून झाला राडा...

मुंबई पोलिसांच्या जवळच्या पोलिस ठाण्यात जेव्हा याबद्दलची माहिती देण्यात आली तेव्हा पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले. सध्या मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार या खाजगी जाहिरात कंपनीमध्ये फार कमी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सुदैवाने या कार्यकर्त्यांनी त्यां कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही इजा केली नाही. केवळ ऑफिसची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी येत तोडफोड करणाऱ्यांना लगेच ताब्यात घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Ropeway रायगडला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रोपवे सेवा ६ दिवसांसाठी बंद

राजपाल यादव अखेर जेलमधून बाहेर, म्हणाला...'बॉलिवूडमध्ये 30 वर्ष मेहनत घेऊनही...'

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्रच मिळणार ? 'या' दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

मुंबईत MMRDAचा जमीनविक्रीचा सपाटा, ४ वर्षात १० हजार कोटींचे भूखंड विकले; आणखी ११ हजार कोटींचे भूखंड विकणार

Pune News: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार! प्रभाग कार्यक्रम जाहीर; पुणे जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायतींसाठी हालचाली

SCROLL FOR NEXT