Vande Bharat Express trial succesful railway official statement pm modi
Vande Bharat Express trial succesful railway official statement pm modi esakal
मुंबई

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेची पहिली वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर घाट विभागात गेल्या तीन दिवस चाचणी सुरु करण्यात आली आहेत. या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता येत्या दोन दिवसात दुसरी वंदे भारत मध्य रेल्वेचा मुंबईत दाखल होणार आहे.

सीएसएमटी- साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी - सोलापूर या दोन वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला १० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करणार आहे. त्या पूर्वी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची रेल्वेकडून घाट माथ्यावर चाचणी घेण्यात येत आहेत. चाचणीसाठी गुरुवारी रात्री वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल झाली हाती.

शनिवारपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत या मार्गावर १०५ किमी प्रतितास, कर्जत-लोणावळा दरम्यान ५५ किमीप्रतितास आणि लोणावळा-सोलापूर दरम्यान ११० किमीप्रतितास या वेगाने चालविण्याची मजुरी देण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी करण्यात येत आहे. वंदे भारत २.० प्रकारातील ही सातवी रेल्वेगाडी आहे.

वंदे भारत ट्रेनची किमंत ११० कोटी -

वंदे भारत एक्स्प्रेसच्या एका गाडीची किंमत सुमारे ११० कोटी आहे. प्रवासी सुविधेसाठी अपघात रोधक कवच यंत्रणा या गाडीत कार्यान्वित आहे. येत्या दोन दिवसात दुसरी वंदे भारत मध्य रेल्वेचा मुंबईत दाखल होणार आहे.

अशा असणार सुविधा - वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य

  • ताशी १८० ते २०० किमी वेगाने धावणार

  • संपूर्ण डबे वातानुकिलत असणार

  • जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्यूअल माहिती प्रणाली

  • स्वयंचलित खिडक्या आणि दरवाजे

  • अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

  • प्रत्येक डब्यात इमरजेंसी पुश बट

  • वैक्युम आधारित टायलेट

  • १८० डिग्री फिरणारी आसने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT