मुंबई

वरंध घाट, तुळशी खिंडीचा मार्ग सुकर 

सकाळ वृत्तसेवा

महाड : सहा महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला महाड-भोर मार्गे पंढरपूर मार्गावरील वरंध घाट आणि कशेडी घाटाचा पर्यायी तुळशी खिंड मार्ग लवकरच वाहतुकीला खुला होणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत वरंध घाटातील काही भाग खचल्याने; तर मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या तुळशी खिंड रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने हे रस्ते बंद करण्यात आले होते. 

महाड-भोर मार्गे पंढरपूर या मार्गावरून भोर, पुणे, बारामती, फलटण, पंढरपूर अशी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. एसटीबरोबरच खासगी बस, मालवाहतूक करणारे ट्रक या मार्गावरून मोठ्या प्रमाणात धावतात. परंतु ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत या घाटातला काही भाग वाहून गेला होता; तर संरक्षक भिंती कोसळल्या होत्या. त्यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने तो बंद केला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ताम्हिणी मार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे वेळ व खर्चातही वाढ झाली. 

हा मार्ग बंद असल्याने भाजीवाहतुकीचा खर्च वाढला होता. त्यामुळे भाजीही महागली होती. पर्यटन व्यवसायावरही याचा परिमाम झाला होता. आता घाटातील खराब रस्त्याच्या भिंतीच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणी 25 फूट उंच आणि 40 फूट लांबीच्या संरक्षक भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. तसेच संरक्षक कठडे बांधले आहेत. 

महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केले आहे. याच आठवड्यामध्ये वरंध घाट वाहतुकीला पुन्हा सुरू होणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या महाड तुळशी खिंड, नातूनगर- खेड रस्ता पावसाळ्यात फाळकेवाडीच्या वरील बाजूस सुमारे 25 ते 30 मीटर वाहून गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती. त्यामुळे कशेडी घाटाला पर्याय असणारा हा रस्ताही पूर्णपणे बंद झालेला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने 35 लाख रुपये खर्च करून पूर्ण केले आहे. त्यामुळे हा रस्ताही चार दिवसांत वाहतुकीस खुला होईल. 
 
वरंध घाट आणि तुळशी खिंड- नातूनगर रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे या आठवड्यात हे दोन्ही रस्ते वाहतुकीला खुले होतील. 
- बी. एन. अहिर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग  


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT