मुंबई

इथे नोकरी मिळेल : मेट्रो प्रकल्पामध्ये आहेत रोजगाराच्या संधी, जाणून घ्या डिटेल्स...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मेट्रो 3 या प्रकल्पामध्ये भुयारी स्थानके, बोगद्यामध्ये कुशल, अकुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीने) पुढाकार घेतला असून कंत्राटदारांमार्फत राज्यातील कुशल, अकुशल कामगारांसाठी 5637 रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील आणि बार फिक्सिंग), वेल्डर, इतर (वायरमन) आणि अकुशल कामगार, रिगर, पाईप फिटर आणि क्रेन ऑपरेटर अशा नऊ विभागात या जागा उपलब्ध आहेत.  

कोरोनाचे संकट अधिक गडद होऊ लागल्यानंतर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र या कालावधीत वाढ झाल्यानंतर अनेक कामगार विविध मार्गांनी मुंबई सोडण्यास सुरुवात केली. परिणामी मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो प्रकल्पांसह विविध विकासकामांना ब्रेक लागण्यास सुरुवात झाली असून कंत्राटदारही चिंतेत आहेत. यामुळे एमएमआरसीतर्फे नऊ विभागांमध्ये एकूण  5637  जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये स्थापत्य कामात भुयारी मेट्रो स्थानकामध्ये स्लॅब, कॉलम, कॉक्रिटीच्या भिंती, जिने आणि इतर कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लोखंडी सळीची बांधणी (फिटर्स), ढाच्याची बांधणी करण्यासाठी (कारपेंटर्स) तसेच काँक्रीट करण्यासाठी कुशल कामगारांची गरज आहे. खोदकाम, साफसफाई व इतर कामांसाठी अकुशल कामगारांची आवश्यकता भासणार आहे.

या जागांसाठी  कामगारांनी एमएमआरसीतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांना संपर्क साधायचा आहे. तसेच आवश्यक अर्हता, अनुभव नसलेल्या अकुशल कामगारांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इच्छुक कामगारांनी नेमून दिलेल्या कंत्राटदारांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच श्रमिक छावण्या उभारत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

उपलब्ध जागा

  • गवंडी : 277
  • सुतारकाम : 804 
  • फिटर (स्टील फिक्सिंग आणि बार फिक्सिंग) : 2038  
  • वेल्डर : 163
  • इतर (वायरमन) : 59 
  • अकुशल कामगार : 1877   
  • रिगर : 312
  • पाईप फिटर : 58
  • क्रेन ऑपरेटर : 49 

various jobs available in mumbai metro rail corporation check details 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT