मुंबई

शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार - वर्षा गायकवाड

सुमित बागुल

मुंबई, ता. 20 : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे असंही वर्षा गायकवाड म्हणालात. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत.  प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

याही बातम्या वाचा : 

varsha gaikwad says decision of the local authorities will be important in terms of starting the school

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Economy: IMF अहवालाचा भारताला झटका! जागतिक अर्थव्यवस्थेच्या टॉप 5 मधून बाहेर; कारण काय?

कोण आहे आलिया भट्टची मोठी बहिण शाहीनचा होणारा नवरा? एक्सने सुद्धा दिल्या शुभेच्छा, तो नक्की करतो काय?

Women Reservation Bill: नवीन आणि जुन्या महिला आरक्षण विधेयकात काय फरक? सीट रोटेशनवरून वाद का? वाचा नव्या नियमांमागचं गणित...

Gold Shortage India : एलपीजी पाठोपाठ देशात आता सोन्या-चांदीचा तुटवडा जाणवणार, दरांवर परिणाम होण्याची शक्यता; 'या'मुळे निर्माण झाले संकट

LPG Supply Update: एलपीजीवर मोठा गेमचेंजर निर्णय! रस्त्यांवरचे टँकर गायब होणार? सरकारची नवी योजना नेमकी काय आहे…?

SCROLL FOR NEXT