मुंबई

अभिनेता वरुण धवनच्या मावशीचे निधन; सोशलमीडियावर वाहिली श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. अगदी सर्वसामान्यांपासून बड्या नेत्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत कोरोनाने अनेकांना विळखा घातला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला कोरोनाचा खूप मोठा फटका बसला आहे. कारण इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासारखे दोन अनमोल हिरे हिंदी चित्रपटसृष्टीने गमावले आहेत आणि त्यातच काल मोहित बघेल या अट्ठावीस वर्षांच्या अभिनेत्याचे निधन झाले आहे. ही बातमी ताजी असतानाच हिंदी चित्रपटसृष्टीला आणखीन एक धक्का बसला आहे. अभिनेता वरुण धवन याच्या मावशीचे निधन झाले आहे. त्याने ही बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या मावशीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

वरुण धवनने अल्पावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक कमावला. मोठमोठी बॅनर्स आणि कलाकारांबरोबर त्याने काम केले. केवळ लव्हर बाॅयची भूमिका न साकारता काही वेगळ्या भूमिकाही त्याने करण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा कुली नंबर १ हा चित्रपट तयार झालेला आहे आणि चित्रपटगृहे सुरू होताच तो पडद्यावर येणार आहे. आपल्या मावशीच्या निधनाची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. तसेच आपल्या मावशीबरोबरच एक फोटोही शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन देताना म्हटले आहे की आय लव्ह यू मौसी...आरआयपी..आणि पुढे गायत्री मंत्रही लिहिला आहे. त्याच्या मावशीचे नेमके कशाने निधन झाले ते समजलेले नाही. परंतु वरुणची ती पोस्ट पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याच्या मावशीला श्रद्धांजली वाहिली आहे. वरुण धवनचे आपल्या आईबरोबरच मावशीवरदेखील खूप प्रेम आणि जिव्हळा होता. मदर्स डेच्या दिवशी त्याने आईबरोबरच मावशीला शुभेच्छा दिल्या होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT