Vasai girl commits suicide after two friends sexual harassment on WhatsApp mumbai police esakal
मुंबई

Crime News : वॉट्सअप वर मित्रांनी लैंगिक स्वैराचाराचे आरोप केल्यामुळे वसईत तरुणीची आत्महत्या; दोघांना अटक

आरोपींना आज वसई न्यायालयात हजर केले असता 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

आरोपींना आज वसई न्यायालयात हजर केले असता 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

नालासोपारा : व्हॉटसअपवर मित्रांनी अतिशय खालच्या पातळीवर लैगिंक स्वैराचाराचे आरोप केल्यामुळे, मानसिक दबावाखाली येऊन वसईत एका 21 वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना उघड झाली आहे.

मुलीच्या मृत्यू नंतर तब्बल 24 दिवसानंतर तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून संगनमतातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन तरुणावर शनिवार ता 28 रोजी रात्री साडे आकाराच्या सुमारास गुन्हा दाखल करून, दोघांना अटक केले आहे. या अटक आरोपींना आज वसई न्यायालयात हजर केले असता 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सॅविन घोन्साल्वीस आणि एबल डिसुजा असे अटक केलेल्या आरोपींची नाव असून हे वसईतील राहणारे आहेत. 4 जानेवारी रोजी मयत मुलगी अटक आरोपी या दोन मिञाबरोबर राञभर व्ह़ॉटसअपवर चॅट करत होती. त्यांनी या चॅटमध्ये तु दोघांशी का अफेअर केलं..? तु आम्हाला धोका का दिला…?

अशी प्रश्नाची सरबती करुन, अतिशय खालच्या पातळीवर राञभर लैगिंक स्वैराचाराचे तिच्यावर आरोप केले होते. तिला हा सर्व मानसिक ञास असह्य झाल्याने मुलीने राहत्या घरातच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा आरोप करीत मयत मुलीच्या वडिलांनी 24 दिवसानंतर वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

याच तक्रारीवरून दोन तरुणावर कलम 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केले आहे. त्यांना वसई न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT