Vasai pana Murder sakal
मुंबई

Vasai Murder: ८ जूनलाही आरतीला केली होती रोहितने मारहाण, मात्र पोलीसांनी केली नाही अटक

Mumbai Crime: चिंचपाडा परिसरात कामावर जात असलेल्या आरतीच्या डोक्यावर रोहितने पाठीमागून लोखंडी पान्हयाने एकापाठोपाठ तब्बल १६ घाव घातले

सकाळ वृत्तसेवा

Pana Murder: वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथे सकाळी साडेआठच्या सुमारास संशयातून एका तरुणाने तरुणीची भररस्त्यात लोखंडी पान्हयाने डोक्यात तब्बल १६ घाव करून हत्या केली.

ती रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत असताना, आजूबाजूला प्रचंड गर्दी असतानाही त्याने पुन्हा तिच्या डोक्यात लोखंडी पान्हयाने घाव केले. चारित्र्यावर संशय असल्यानेच तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली आहे. ८ जूनलाही आरतीला रोहितने मारहाण केली होती.मात्र पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती.

आरती यादव (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर रोहित यादव (२८) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. हेदोघेही नालासोपारा शहरात राहणारे आहेत. दोघांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरती वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथील एका खाजगी कंपनीत कामाला होती. तर रोहितही एका कंपनीत कामाला आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास चिंचपाडा परिसरात कामावर जात असलेल्या आरतीच्या डोक्यावर रोहितने पाठीमागून लोखंडी पान्हयाने एकापाठोपाठ तब्बल १६ घाव घातले.

रक्तबंबाळ होऊन रस्त्यावरच कोसळलेली आरती जिवंत आहे का हे पडताळून पाहून रोहितने पुन्हा तिच्या डोक्यावर लोखंडी पान्हयाने घाव घातले. यावेळी काही जणांनी रोहितला रोखण्याचाही प्रयत्न केला. पण, संतापलेला रोहित त्यांनाच मारण्याची धमकी देत आरतीवर घाव घालत होता. आरतीची हत्या केल्यानंतर रोहित शेजारीच असलेल्या एका दुकानाच्या पायरीवर बसून राहिला होता.

याघटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रोहितला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रोहित यादवला अटक केली आहे. आरतीच्या चारित्र्यावर संशय असल्यानेच रोहितने तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

८ जूनलाही आरतीला केली होती मारहाण

रोहितने ८ जूनच्या रात्री आरतीला लाथ्याबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच तिचा नवा मोबाईलही फोडला होता. याप्रकरणी आरतीच्या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी रोहितविरोधात गुन्हाही दाखल केला होता. मात्र, त्याला अटक करण्यात न आल्याने तो मोकाट सुटला होता. त्यानंतर १८ जूनच्या सकाळीच रोहितने आरतीची हत्या केली. आचोळे पोलिसांनी ८ जूनला रोहितवर कारवाई केली असती तर आरतीची हत्या झाली नसती. पोलिसांनी त्याला दांडक्याने दोन-तीन फटके मारून सोडून दिले होते, असा आरोप आरतीच्या बहिणीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT