crime sakal media
मुंबई

वसईत अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार ; तिघांना पोक्सो कायद्याखाली अटक

विजय गायकवाड

विरार : वसईतील एका 17 वर्षीय अनाथ मुलीच्या (orphanage) असहायतेचा फायदा घेत तीन जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार (molestation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी (vasai railway police) एका ट्रक चालकासह दोघांना ताब्यात (three people arrested) घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसई परिसरातील ट्रक चालक व त्याच्या दोन साथीदारांनी एका 17 वर्षीय अनाथ मुलीवर तिच्या असहायतेचा फायदा घेत आळीपाळीने बलात्कार केला. हि घटना वसई पूर्व येथील राजवली परिसरात घडली. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाल्याने आरोपींनी तिला रेल्वेने दादर स्थानकांत सोडून पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकातील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना ती मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्यांनी तातडीने तिला जे. जे. रुग्णालयात दाखल केले.

सदर पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी महिला समुपदेशिकेच्या मदतीने माहिती घेतली. आणि गुन्हा वसईतील असल्याने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार यांना पोस्को कायद्याखाली अटक केली आहे. पुढील तपास वसई रेल्वे पोलीस ठाणे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT