मुंबई

वसईः तुंगारेश्वर मंदिराच्या परिसरात असणाऱ्या अमृत धाम जैन मंदिरात चोरी

विजय गायकवाड

मुंबईः  वसईच्या तुंगारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या अमृत धाम जैन मंदिरात गुरुवार पहाटे 3च्या सुमारास चोरीची घटना घडली आहे.  दोन चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मंदिरातील पंचधातूंच्या 12 मूर्ती, दानपेटी असा अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे फरार झाले आहेत. चोरीचा हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच चोरट्यांना पकडण्यात येईल असा आशावाद वालीवचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गालगत तुंगारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी अमृतधाम जैन मंदिर आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्रीची पोलिसांची गस्त ही सुरू आहे. हे सर्व असतानाही दोन चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी आणि 11 पंचधातूंच्या मूर्ती घेऊन चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. आज सकाळी मंदिर ट्रस्टला याची माहिती दिल्यानंतर ट्रस्टने याची माहिती वालीव पोलिस ठाण्यात दिली.

मंदिराचा प्रश्न असल्याने विरार झोन 03 चे पोलिस उपायुक्त प्रशांत वागुंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल मांडवे, वालीवचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मंदिरातील सीसीटीव्ही तपासले असता आज पहाटे 2 चोर चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहेत. 12 तासाच्या आत चोरटे गजाआड करण्यात येतील अशा विश्वास ही पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरी करणाऱ्या चोरट्यांचे तोंड सीसीटीव्ही स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे या चोरट्या ना पकडणे पोलिसांना सहज शक्य होईल. पण सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी चोरीची घटना घडल्याने स्थानिक नागरिक, मंदिर ट्रस्ट यांच्यात एक भीतीचे वातावरण पसरले आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Vasai Theft Amrit Dham Jain Temple vicinity of Tungareshwar Temple

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

SCROLL FOR NEXT