vasai market 
मुंबई

वसई-विरारमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा; मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा...

प्रसाद जोशी

वसई : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनलॉकनंतर निश्चित वेळ ठरवून दुकाने खुली करण्यात आली होती. त्यात आता बदल करून वसई-विरार महापालिका हद्दीतील दुकानांना दोन तास अधिक मुभा देण्याचा निर्णय महापालिकेने अटी-शर्तीसह घेतला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पूर्वी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवावी, असे जाहीर केले होते; मात्र पालिका प्रशासनाने ही वेळ वाढवून सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येतील, असे आदेश काढले आहेत; मात्र वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणची दुकाने सुरू राहणार आहेत. सामाजिक अंतर राखणे, दुकानांत गर्दी होऊ नये याची काळजी घेणे, तसेच मास्क घालणे असे निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त गंगाथरन डी यांनी दुकानदारांना दिला आहे.

हॉटेल, अतिथिगृहांना परवानगी 
वसई-विरार महापालिकेत असणाऱ्या हॉटेल, अतिथिगृह सुरू करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश पालिका प्रशासनाने काढला आहे. विशिष्ट बंधने घालण्यात आली आहेत. तसेच हॉटेल सुरू करण्याचे जाहीर केले असले तरी जेवणासाठी परवानगी देण्यात आली नाही. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्याच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी मालकाने, चालकाने करावी, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---

संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT