Vasai Virar Marathi News Sakal
मुंबई

Vasai Virar News: त्या २९ गावांचा मुद्दा पुन्हा आला ऐरणीवर; वाचा काय आहे प्रकरण

वसई-विरारच्या २९ गावांच्या सीमावादावर सरकारची नवीन अधिसूचना; नागरिकांना मांडावयाच्या हरकतीस ३० दिवसांची मुदत | New Government Notification on Demarcation of 29 Villages of Vasai-Virar; 30 days deadline for citizens to raise objections

सकाळ वृत्तसेवा

Vasai Virar News: वसई-विरार महापालिका स्थापन झाल्यावर २९ गावे हद्दीतून वगळण्याच्या मुद्द्यावरून वातावरण संतप्त झाले होते. त्यानंतर आंदोलन, मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांचा आक्रोश समोर आला होता. यासंदर्भात राज्य सरकारच्या नगररचना विभागाने बुधवारी (ता. १४) अधिसूचना जाहीर केली आहे.

यामध्ये महापालिकेच्या सीमेमध्ये फेरफार करत असल्याचे म्हटले आहे. २९ गावांची सीमा आणि हरकतीबाबत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. नागरिकांना हरकती मांडायच्या असतील तर ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा गावांचा मुद्दा समोर आला आहे.

महाराष्ट्र महापालिका कायद्यातील अधिकारांचा वापर करून वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयामुळे प्रभावित होणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी ही सूचना असल्याचे म्हणण्यात आले आहे.

यानुसार राज्य सरकारचे राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांच्या सूचना महाराष्ट्र सरकार विचारात घेणार आहे. या कालावधीत मसुद्याच्या संदर्भात हरकती किंवा सूचना प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय यांच्याकडे सादर करता येणार आहेत. त्या सूचना सरकारकडून विचारात घेण्यात येतील, असे उपसचिव शंकर जाधव यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

वसई-विरार महापालिकेबरोबर विचारविनिमय करून अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये फेरफार करत असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. अधिसूचना जाहीर केल्याच्या वृत्ताला महापालिका प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला.

त्यामुळे सुधारित चतुःसीमा आणि महापालिकेत समाविष्ट करण्यात असलेल्या २९ गावांतील नागरिक कोणत्या हरकती किंवा सूचना नगररचना विभागाकडे देणार व त्यानंतर कोणता निर्णय सरकारकडून घेतला जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे.

महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याच्या गावांची नावे

आगाशी, कोफराड, बापाणे, ससूनवघर, भुईगाव बुद्रूक, भुईगाव खुर्द, गास, गिरीज, कौलार बुद्रूक, कौलार खुर्द, नवाळे, वाघोली, निर्मळ, दहिसर, नाळे, राजोडी, वटार, चांदीप, कशीदकोपर, कसराळी, कोशिंबे, चिंचोटी, देवदळ, कामण, कण्हेर, कोल्ही, मांडवी, शिरसाड, सालोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT