मुंबई

वसई विरार: नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दोन हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

विजय गायकवाड

मुंबईः राजोडी समुद्र किनाऱ्यावर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दोन हॉटेल्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते तसंच वसई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड 19 चे संकट लक्षात घेता 5 पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये, हॉटेल्स, रिसॉर्ट, समुद्र किनार्यावर नागरिकांनी गर्दी करू नये, अशा सूचना देण्यात आल्यात.

मात्र राजोडी समुद्र किनाऱ्यावरील हॉटेल्स मालकांनी नियमांचे उल्लंघन केलं आणि पर्यटकांना हॉटेल्समध्ये बसवून दारूची विक्री आणि दारू पिण्यास परवानगी दिली. यामुळे पोलिसांनी दोन हॉटेल्स व्यावसायिक आणि दारू पिणाऱ्या 17 नागरिकांवर अर्नाळा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात भादवी कलम 188, 269,270 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब) सह महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम  कलम 65 (ब) वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

वसई राजोडी बीचवरील हॉटेल सी ढाबा, हॉटेल हायटाईट या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या सरकारच्या नियमांचे उल्लंघन करून, दारूची विक्री, आणि दारू पिणाऱ्या नागरिकांना हॉटेल्समध्ये बसवून पार्टी करण्याची परवानगी देण्यात आली होती. पोलिस ठाणे अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पथकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर अंमली पदार्थ आणि हॉटेल्सवर कारवाई पथक यांनी पोलिस उपायुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारला. या छापेमारीत  17 पर्यटक दारू पिताना आढळून आले. या 17 ही लोकांना ताब्यात घेऊन, हॉटेल्सवर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Vasai Virar Police take action against two hotels break 31st rules

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT