narayan rane
narayan rane sakal
मुंबई

वसई विरार : महापालिका निवडणुकीत राणेंच्या सभा उधळणार

सकाळ वृत्तसेवा

विरार : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अनादर करीत त्यांच्यावर टीका केली होती. याचे पडसाद जसे राज्यात उमटले तसे ते वसई विरार मध्येही उमटले आहेत विरार, नालासोपारा, वसई येथे नारायण राणे यांच्या पुतळ्याला चपळाने मारण्यात आले असून तालुक्यात तीन ठिकाणी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्ररी करण्यात आल्या आहेत.

त्यातच आज नारायण राणे पालिका निवडणुकीच्या प्रचाराला आल्यास त्यांच्या सभा उधळण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिल्याने निवडणुकीतही याचे पडसाद उमटण्याची श्यक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काळ महाड येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानकारक वक्तव्य केल्याकारचे पडसाद आज राज्यभर उमटले ठीक ठिकाणी नारायण राणेंचा निषेध करण्यात आला.

तर काही ठिकाणी त्यांच्या फोटोला चपळाने मारण्यात आले यात वसई , विरार आणि नालासोपारा येथेही शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनवर जाऊन निषद करण्याबरोबरच तक्रारीही दाखल केल्या आहेत. यावेळी माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, नवीन दुबे, तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, प्रभा सुर्वे, संतरोष तम्बोलकर, प्रदीप सावंत, राजाराम बाबर, पंकज देशमुख, सौ.किरण चेन्दवणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या बाजूला माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेद करतानाच वसईमध्ये पुन्हा या शिवसैनिक कानाखाली कसे मारतात ते दाखवू असे आव्हान देतानाच येणाऱ्या निवडणुकीत प्रचारासाठी नारायण राणे आल्यास त्यांच्या सभा उधळण्याचा इशारा त्यांनी दिल्याने येणारी निवडणूक भाजप विरोधात शिवसेना अशी गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT