wastage of water sakal media
मुंबई

वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

सकाळ वृत्तसेवा

वसई : यंदा पाऊस चांगला झाल्याने वसई-विरारला (vasai virar) पाणीपुरवठा करणारी धरणे (dam) पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा (water scarcity) सामना यंदा नागरिकांना करावा लागणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा (water supply) करणाऱ्या पाईपलाईनमधून ठिकठिकाणी गळती होत असून हजारो लिटर पाणी वाया (wastage of water) जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या गळतीवर पालिकेला ठोस उपाय अजूनही करता आला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

वसई-विरार शहरात सूर्या धामणी, उसगाव व पेल्हार धरणातून पाणी पुरवले जाते. याकरिता पिण्याच्या पाण्याच्या टाक्या प्रत्येक प्रभागात बसविण्यात आल्या आहेत. नवीन जलवाहिनी टाकली आहे. मागेल त्याला पाणी योजनेतून लाखोंच्या संख्येने नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. रहिवासी संकुलांना त्यामुळे दिलासा मिळाला असला तरी वारंवार पम्पिंग स्टेशनमध्ये होणारा बिघाड, कमी व अनियमित दाबाने येणारे पाणी यामुळे नागरिकांना पाणीचिंता सतावत असते. गेल्या वर्षी महापालिकेने महामार्ग ते शहरांतर्गत होणारी पाणी गळतीबाबत सर्व्हे केला व दुरुस्ती केल्याचे स्पष्ट केले असले तरी गळती काही केल्या थांबत नाही.

अधिकारी वर्ग ज्या मार्गावरून ये-जा करतात त्याठिकाणीही हजारो लिटर पाणी वाया जात असते. वसई वालीव, सातिवली, नालासोपारा संतोषभुवन, सोपारा, माणिकपूर, श्रीरामनगर, पेल्हार, आचोळे, विरार, नायगाव यासह अनेक भागांत पाणी वितरित करण्यासाठी असलेल्या झडपांतून पाणी गळती होत आहे. पाण्याच्या गळतीमुळे १० टक्के पाणी वाया जात आहे. त्यातच नळजोडण्यांमध्ये झालेली वाढ व धरणाची क्षमता कमी आहे, नव्या योजना अद्याप कार्यान्वित झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, महागडे पाणी विकत घ्यावे लागते.

"ज्या ठिकाणी पाणी गळती होते त्याची पाहणी करून त्वरित गळती रोखली जाईल. काही झडपांतून एयर वॉल असल्याने पाणी थोड्या प्रमाणात बाहेर येत असते. मात्र, नागरिकांना पाणी वेळेवर व पुरेसे मिळावे याकरिता प्रशासन नियोजनानुसार पाणी वितरित करते."
- आर. के. पाटील, अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT