वसई ः पूर्व भागात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य. 
मुंबई

वसईकर समस्यांच्या दुष्टचक्रात

सकाळ वृत्तसेवा

वसई ः वसई पूर्वेतील नागरिकांना कचराभूमीबरोबरच अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे; मात्र याकडे अद्याप वसई-विरार महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून यातून सुटका कधी होणार, असा प्रश्‍न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

वसई-विरार शहरातील कचरा भोयदापाडा येथे जमा केला जातो. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. आगीच्या घटना घडतात, धुराचे लोट बरेच दिवस कायम राहत असल्याने औद्योगिक व नागरी वस्तीला त्रास होतो. येथील वाघरळपाडा येथील १० हजार लोकवस्ती असणाऱ्या नागरिकांना गटार, वीज, पाणी, नाला आणि रस्ते आदी सुविधा अद्यापही मिळाल्या नाहीत. घराच्या आजूबाजूला छोटे गटार तयार करण्यात आले आहे; मात्र ते तुडुंब भरल्यावर कच्च्या रस्त्यावर घाणीचे पाणी येते आणि यातूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.

पावसाळ्यात तर येथील परिस्थिती अत्यंत बिकट असते. पाण्याची समस्यादेखील भेडसावत असून, येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यातच नागरिकांना दूरहून पाणी आणावे लागते; अन्यथा पर्याय म्हणून टॅंकरचे दूषित पाणी खरेदी करावे लागत आहे. विजेची समस्यादेखील आहे. 

खासगी वाहने त्या ठिकाणच्या गावात येण्यासाठी नकार देतात. त्यामुळे दीड किलोमीटर प्रवास चालत करावा लागतो. कचरा उचलला जात नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. चिंचपाडा येथेदेखील गटारांची असुविधा आहे. चाकरमानी आणि लोकवस्तीमधील नागरिकांनी वारंवार पालिकेकडे पाठपुरावा केला असला, तरी परिस्थिती जैसे थी अशीच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुविधा कधी मिळणार आणि आमच्या भागात अच्छे दिन कधी येणार, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

चिंचपाडा येथे खराब रस्त्यामुळे गटाराचे पाणी वाहून रस्त्यावर येते. करदाते पालिकेला सुविधांसाठी कररूपात पैसा देत असले, तरी सपशेल दुर्लक्ष केले जात आहे आणि याचा त्रास रहिवाशांना होत आहे. महापालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना करावी.
 काकासाहेब मोटे, माजी सदस्य, पंचायत समिती, वसई

वसई पूर्वेतील नागरिकांना गटार, पाणी व अन्य मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. भोयदापाडा व वाघरळपाडा येथे विकासकामे लवकरच केली जातील. यासाठी आर्थिक निधी मंजूर करण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
कन्हैया भोईर, सभापती, प्रभाग समिती

वसई-विरार महापालिकेच्या योजना कागदावरच आहेत; प्रत्यक्ष मात्र कृती होताना दिसत नाही. वसई पूर्वेला अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. महिलांना दूर जाऊन पाणी आणावे लागते. रस्ते नादुरुस्त, गटारांची दुरवस्था, अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यास महापालिका अपयशी ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
जयेंद्र पाटील, मनसे, जिल्हाध्यक्ष, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

US Missile Test: ‘डुम्सडे मिसाईल’ची यशस्वी चाचणी; अमेरिकेकडून पुन्हा शक्तिप्रदर्शन

Ro-Ro Boat: रो-रो फेरी सुरू होताच बंद, प्रवाशांचे आरक्षण पैसे परत; नेमके कारण काय?

Loco Pilot Leaves Train : ट्रेन अर्ध्यातच उभी करुन निघून गेला लोको पायलट; होळीच्या गर्दीत प्रवाशांना ३ तास सहन करावा लागला मनस्ताप

Latest Marathi News Live Update : इराण युद्धाचा पाकिस्तानला तगडा झटका

SCROLL FOR NEXT