Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Team eSakal
मुंबई

'वेदांता-फॉक्सकॉन'साठी आम्हीच सर्व केलं, मविआ सरकारनं नाही - फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : Vedanta-Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी आम्हीच सर्वकाही केलं, महाविकास आघाडीनं काहीही केलेलं नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांची केवळ नौंटकी सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Vedanta Foxconn project was brought by us not by MVA govt says Devendra Fadnavis)

फडणवीस म्हणाले, पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक कशी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल. एकूण बजेटच्या २५ टक्क्यांपर्यंत ही गुंतवणूक नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. MIDCकडून सांगण्यात आलंय की, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी राज्यात कोणतीही जागा देण्याचा करार झालेला नाही. तसेच जागेचा सर्वे देखील झालेला नाही, ही माहिती खरीच आहे. राज्यात केवळ नौटंकी सुरु आहे. वेंदाच्या प्रकल्पाला पहिल्यांदा आमचं सरकार आल्यावर जागा दाखवण्यात आली. तोपर्यंत त्यांना जागा दाखवण्यात आलेली नव्हती. याबाबत गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं कॅबिनेटची मिटिंगही घेतली नव्हती.

दरम्यान, जेव्हा आम्हाला हे कळलं की हा प्रकल्प गुजरातला चालला आहे तेव्हा शेवटचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी प्रकल्प अधिकाऱ्यांना दोनदा पत्र लिहिलं, त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन भेटलो. तसेच गुजरातपेक्षा त्यांना आम्ही चांगलं पॅकेज देतो असंही सांगतलं. तसेच जागाही देण्याच त्यांना सांगितलं हे सर्व आमच्या काळात झालं. महाविकास आघाडीच्या काळात काहीही झालं नाही, त्यांच्याकडून केवळ नौटंकी सुरु आहे. पण त्यांच्या नौटंकीला आम्ही सडेतोड उत्तर देऊ, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

आता ज्या ज्या राज्यांमध्ये उद्योगांसाठी चांगल्या गोष्टी होत आहे तिथं जाऊन आम्ही पाहणी करणार आहोत. त्यानंतर त्या गोष्टी महाराष्ट्रात कशा राबवता येतील, हे देखील पाहू, असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT