मुंबई

महाराष्ट्रातील पहिलंच शहर जिथं भाजी मार्केट्स बंद, आयुक्तांनी घेतला तडकाफडकी निर्णय

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर : वारंवार आवाहन करूनही लांब अंतर ठेवण्यात आणि गर्दी कमी करण्यात नागरिक पुढाकार घेत नसल्याने काल म्हणजेच दिनांक ३ एप्रिल पासून सायंकाळी 5  वाजेनंतर संपूर्ण भाजी मार्केट्स बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तडकाफडकी घेतला आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याने संपूर्ण उल्हासनगर पूर्णपणे थांबलेले चित्र पाहायला मिळालं. संध्याकाळी ५ वाजेनंतर नंतर भाजी मार्केट्स बंद करणारं उल्हासनगर हे महाराष्ट्रातील पहिलेच शहर ठरले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन, संचारबंदी असताना उल्हासनगर मधील नागरिकांना अनेक दिवसांपासून सोशल डिस्टनसिंग ठेवण्याबाबत सूचना देऊनही, भाजी मार्केट मध्ये गर्दी होताना दिसतेय. याशिवाय भाजी विक्रेतेही सुरक्षित अंतर ठेवत नसल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात जेवढे प्रमुख भाजी मार्केट्स आहेत त्यासोबत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भाजी आणि फळे विक्रेत्यांच्या हातगाड्या ह्या सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे निर्देश उल्हासनगरातील प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजय एडके, भगवान कुमावत, तुषार सोनवणे यांना देण्यात आले आहेत. अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.

मेडिकलची दुकाने हे बंद मधून वगळण्यात आले असून किराणा मालाच्या दुकानांना रात्री 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे. तिथेही नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास या दुकाच्या बाबतीतही भाजी मार्केटप्रमाणेच निर्णय घेतला जाईल, असा इशारा देखील सुधाकर देशमुख यांनी दिला आहे.

दरम्यान देशमुख यांच्या आदेशाने संध्याकाळी ५ पासून रात्री उशिरापर्यंत भाजी घेण्याच्या बहाण्याने बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

vegetable markets will be closed after 5 pm ulhasnagar municipal commissioner took important decision   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT